कै. अविनाश जोशी स्मृतिप्रीत्यर्थ नाशिक इथे पहिले सह्याद्री मित्र संमेलन आयोजित करण्यात (दिनांक 7 जुलै) आले होते. यावेळी अनेक वर्षे वाटाडे म्हणून काम करणाऱ्या तरुणांचा आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला.
राज्यभरातून गिर्यारोहक, फोटोग्राफर, ब्लॉगर यांची माहिती मागवून घेत जेष्ठ गिर्यारोहक संजय अमृतकर (नाना ) यांनी योग्य प्रकारे निवड प्रक्रिया राबवत त्यांना पुरस्कार प्रदान केले. यावेळी माऊंटन सर्च आणि रेस्क्यू टीम ऑफ दी इयर पुरस्कारासाठी लोणावळा येथील शिवदुर्गची माहिती पाठवली गेली होती, त्यातून शिवदुर्ग मित्रला हा पुरस्कार जाहीर झाला होता. ( Shivdurg Mitra Was Awarded First Mountain Search And Rescue Team Of The Year Award )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
माऊंटन सर्च आणि रेस्क्यू टीम ऑफ दी इयर अशा प्रकारचा संपूर्ण महाराष्ट्रातून हा पहिलाच पुरस्कार होता. शिवदुर्ग मित्र मागील 20 वर्षे डोंगरदऱ्यात माउंटन सर्च आणि रेस्क्यू करित आहे. शिवदुर्गला इतर शासकीय, सस्थांचे अनेक पुरस्कार मिळाले पण ते त्या एका विशिष्ट रेस्क्यू साठीचे होते. मात्र सह्याद्री मित्र संमेलनाच्या निमित्ताने प्रथमच ‘माउंटन सर्च ॲण्ड रेस्कु टिम ऑफ दि इअर’ या सन्मानाने शिवदुर्ग मित्र लोणावळा रेस्क्यू टीमला गौरवण्यात आले.
रोख 25000 रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. गिर्यारोहक प्रिती पटेल मॅडम यांच्या हस्ते संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिवदुर्गचे उपाध्यक्ष महेश मसने, सचिव सुनिल गायकवाड, संचालक राजेंद्र कडू, योगेश उंबरे, अनिल आंद्रे यांनी पुरस्कार स्विकारला. सदर कार्यक्रमाला अनेक गिर्यारोहक, लेखक, प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित होती. जेष्ठ गिर्यारोहक लेखक हरिषजी कपाडिया, जेष्ठ लेखक आनंदजी पाळंदे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.
अधिक वाचा –
– कासारसाई धरणाबाबत मावळ – मुळशी तालुक्यातील शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची आमदार शेळकेंसोबत संयुक्त बैठक
– आनंदाची बातमी! चांद्रयान-3 ने पृथ्वीभोवती पूर्ण केली एक फेरी, सध्या 42 हजार किलोमीटरहून अधिक उंचीवर प्रवास सुरु