मावळ तालुक्यातील ( Maval News ) शिलाटणे गावातील शिवभक्त तरुण किल्ले मल्हारगड येथून शिवज्योत घेऊन परतीच्या मार्गावर असताना ( Maval Accident ) त्यांच्या वाहनाला एका भरधाव कंटेनरने आज (शुक्रवार, दिनांक 10 मार्च) रोजी धडक दिली.
शिवभक्तांच्या टेम्पोचा ( Shivbhakt Accident ) पुणे-बेंगलोर हायवेवर ताथवडेजवळ शुक्रवारी पहाटे हा अपघात झाला. या अपघातात अनेक शिवभक्त जखमी झाले, अनेकजण यात गंभीरही होते. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांवर जवळील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळचे आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांनी या सर्व जखमी शिवभक्तांची संबंधित रुग्णालयात जात भेट घेतली आहे. अपघातात जखमी झालेल्या शिवभक्तांवर पवना, पायोनियर, ओजस या काही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ( MLA Sunil Shelke Met With Injured Shivbhakt )
आपल्या मावळ तालुक्यातील शिलाटणे गावातील शिवभक्त किल्ले मल्हारगड येथुन शिवज्योत घेऊन परतत असताना त्यांच्या गाडीला पुणे-बेंगलोर हायवेवर ताथवडेजवळ भरधाव कंटेनरने पहाटे धडक दिल्याची दुर्दैवी घटना घडली.या अपघातातील जखमींवर ओजस हॉस्पिटल रावेत, पवना हॉस्पिटल, पायोनियर हॉस्पिटल सोमाटणे pic.twitter.com/xP5ZDo0G1v
— Sunil Shelke (@shelkesunilanna) March 10, 2023
सर्व जखमी शिवप्रेमी तरुणांची आमदार सुनिल शेळकेंनी विचारपूस केली. तसेच जखमी शिवभक्तांना योग्य ते उपचार मिळावेत, याबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थनाही केली. ( ShivJayanti 2023 Shiv Devotees of Shilatne Village From Maval Taluka Had An Accident At Pune MLA Sunil Shelke Met With Injured Shivbhakt )
अधिक वाचा –
– जखमी शिवभक्तांची खासदार बारणे, बाळा भेगडेंनी घेतली भेट; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदतीचे आश्वासन
– अर्थसंकल्पातून मावळ तालुक्याला काय मिळालं अन् काय राहिलं? लवकरच समजणार! आजी-माजी आमदार घेणार पत्रकार परिषद