गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु असलेल्या राजकीय चर्चांना आज अखेर पूर्ण विराम मिळाला आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी दादरमधील आंबेडकर भवन येथे संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवशक्ती आणि भीमशक्ती ( Shivshakti And Bhimshakti ) एकत्र येत असल्याची घोषणा केली आहे. आज ( सोमवार, दिनांक 23 जानेवारी) रोजी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी युतीची ही घोषणा महाराष्ट्र ( Maharashtra ) राज्याच्या राजकारणातील अलिकडच्या काळातील सर्वात मोठी घटना मानली जात आहे. ( Shivsena Uddhav Thackeray And VBA Prakash Ambedkar Announce Alliance )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मागील दोन दिवसांपासून स्वतः बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेले सुतोवाच आणि ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी त्याला दिलेला दुजोरा पाहता, ही युती होणार अशी अटकळ होती. अशात सोमवारी (23 जानेवारी) सकाळीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत या युतीबद्दल जवळपास खात्री वर्तवली होती. “शिवशक्ती आणि भीमशक्तीचा एल्गार, संयुक्त पत्रकार परिषद. 23 जानेवारी दुपारी 12.30 वाजता. आंबेडकर भवन, नायगाव, दादर महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे पर्व…” अशा प्रकारचे ट्विट राऊत यांनी केले होते. ( Shivsena Uddhav Thackeray And VBA Prakash Ambedkar Announce Alliance Of Shivshakti And Bhimshakti On Balasaheb Thackeray Birth Anniversary Day )
आज वंचित बहुजन आघाडी पक्ष प्रमुख ऍड.प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्ष प्रमुख मा. उद्धव ठाकरे यांनी युती जाहीर केली. ही युती महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारी ठरेल. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.@Prksh_Ambedkar @OfficeofUT @rautsanjay61#VBAShivSenaAlliance pic.twitter.com/jVblfBWOpT
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) January 23, 2023
शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अॅड. प्रकाशजी आंबेडकर यांची संयुक्त पत्रकार परिषद । आंबेडकर भवन, दादर – LIVE
♦️ सोमवार – २३ जानेवारी २०२३ https://t.co/1gQbxwRhhp#UddhavThackeray #PrakashAmbedkar #PC
— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) January 23, 2023
त्यानंतर दादरच्या आंबेडकर भवनात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे एकत्र आले होते. सुरुवातीला दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य केले, त्यानंतर शिवशक्ती-भीमशक्तीच्या एकत्र येण्याची गरज बोलवून दाखवत, राज्याच्या राजकारणातील नव्या पर्वाची नांदी ठरणाऱ्या या ऐतिहासिक युतीची घोषणा केली. यावेळी दोन्ही पक्षाचे अनेक मान्यवर, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा –
– बाळासाहेब ठाकरे जयंती : शिवसेनाप्रमुखांच्या आयुष्यातील हे महत्वाचे टप्पे माहितीयेत का? नक्की वाचा । Balasaheb Thackeray
– मोठी बातमी! शरद पवार यांचा सर्वात जुणा आणि जवळचा सहकारी काळाच्या पडद्याआड
– पवना शिक्षण संकुलात वृक्षारोपण; कार्यक्रमादरम्यान आमदार शेळकेंची खास मागणी आणि मंत्री मुनगंटीवारांचे तात्काळ आश्वासन, वाचा