Dainik Maval News : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे लगत असणाऱ्या बेडसे गावच्या हद्दीतील नाल्यात एका युवकाचा निर्घृण खून करून मृतदेह टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात कामशेत पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपीने दिनांक १८ जून रोजी अज्ञात कारणावरून अज्ञात ठिकाणी सदर युवकाचा धारदार शस्त्राने खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह वाहनातून आणून तो बेडसे गावच्या हद्दीतील एक्सप्रेस वे जवळील पाण्याच्या नाल्यात (कि.मी. ७१/३५०) टाकला. याप्रकरणी कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत युवकाची ओळख पटलेली नसून, त्याचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे, रंग काळा सावळा, उंची सुमारे ५ फूट ५ इंच, अंगाने सडपातळ, डोक्यावर कमी केस, कोरलेली दाढी व बारीक मिशी आहे. त्याने पांढऱ्या रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट, काळ्या/रासवाडी रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केली आहे. वरील वर्णनाशी जुळणारी काही माहिती असल्यास नागरिकांनी तत्काळ कामशेत पोलिसांशी संपर्क करा, असे आवाहन केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल – लगेच चेक करा
– धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा, पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या ; राज्याच्या मुख्य सचिवांचे निर्देश
– PHOTO : विठ्ठलाच्या भेटीला जगद्गुरू निघाले… देहूनगरीतून तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मुक्काम इनामदार वाड्यात
– तळेगाव दाभाडेपासून उरुळीकांचनपर्यंत नवीन लोहमार्ग केला जाणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती । DCM Ajit Pawar