तळेगाव दाभाडे येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. तळेगावात एका सार्वजनिक शौचालयातील कचऱ्यात एक दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक आढळून आले आहे. बुधवारी (दि. 17 एप्रिल) रोजी सकाळी 9 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिस अंमलदार सुनील सगर यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिलीये. त्यानुसार अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे शहरात एका सार्वजनिक शौचालयात असलेल्या कचऱ्यात अर्भक असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अर्भक ताब्यात घेतले. त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा पूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ( Shocking A day old Infant was found in public toilet in Talegaon Dabhade )
पुरुष जातीचे अर्भक असून त्याचे वय एक दिवस एवढे आहे. अर्भकाची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने त्याला अशा प्रकारे टाकून देण्यात आले आहे. पोलिसांनी अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.
अधिक वाचा –
– लायन्स क्लबकडून खोपोली महोत्सवाचे आयोजन, पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Khopoli News
– वडगावमधील अनंता कुडे आणि डॉ. तृप्ती शहा यांना सामाजिक पुरस्कार प्रदान । Vadgaon Maval
– शिळींब येथे हॅपी स्कूल आणि हॅपी अंगणवाडी प्रोजेक्टचे लोकार्पण; विद्यार्थ्यांची पायपीट थांबावी याकरिता सायकलींचे वाटप