प्रियकर तथा होणाऱ्या नवऱ्याच्या मानसिक छळाला कंटाळून 21 वर्षीय तरुणीने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात घडली आहे. होणाऱ्या पतीने चारित्र्याचा संशय घेत लग्नाला टाळाटाळ केल्याने आणि मानसिक छळ केल्याने अखेर नैराश्यातून तरुणीने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरी आत्म’हत्या केली. याप्रकरणी रविवारी (दि. 24 डिसेंबर) रोजी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात हा संपूर्ण प्रकार सुरु होता. अखेर होणाऱ्या पतीच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणीने राहत्या घरी दिनांक 16 डिसेंबर रोजी आत्म’हत्या केली. याप्रकरणी महिला फिर्यादीने तळेगाव एमआयडीसी पोलिसांत रविवारी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी अभिजीत अनिल राठोड (रा. सायन हॉस्पीटल कामगार चाळ, मुंबई) याच्या विरोधात भा.द.वि. कलम 306, 504 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्याप अटक नसून सपोफौ शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ( shocking incident in maval taluka girl commits suicide due to mental harassment of her future husband )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार मुलीचा प्रियकर जो की तिचा होणारा नवरा होता त्याने सदर मुलीबरोबर प्रेम करण्याचे नाटक करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. परंतू, नंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन लग्नाला टाळाटाळ करू लागला. तसेच, तिला समोर आणि फोनवर शिवीगाळ करणे, फोन नंबर ब्लॉक करुन अबोला धरणे, असे प्रकार सुरु केल्याने मुलीने अखेर मानसिक छळाला कंटाळून नैराश्यातून राहत्या घरात आत्म’हत्या केली, असे फिर्यादीत नमुद आहे. प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून सुरु आहे.
अधिक वाचा –
– लोणावळ्यात व्यापाऱ्यांवर झालेल्या मारहाणप्रकरणी दोषींवर कडक कारवाईची मागणी, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
– मोठी बातमी! पवनानगर भागातील जुगार अड्ड्यांवर IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त
– मावळ तालुका महाविकास आघाडीची बैठक संपन्न! आगामी निवडणूका आणि तालुक्यातील प्रश्नांवर चर्चा