Dainik Maval : जरा-जिवंतीका पूजनाचे विधान – या पूजनाची माहिती स्कंदपुराणात आहे. या देवते विषयी अनेक लोक कथा प्रसिध्द आहे. एक कथा तर आगदी महाभारातातील जरासंधाच्या जन्माशी निगडीत आहे. जरा नावाच्या राक्षसीणीची कथा जोडली आहे. जरा म्हणजे राक्षसीण नव्हे तर मग कोण आहे. काही शास्त्रकार जरा म्हणजे म्हातरपण् असा अर्थ सांगतात. संस्कृत शब्दांचे स्थानिक भाषेत वेगळेच अर्थ सांगितले जातात. शास्त्रीय ग्रंथ हे संस्कृतमध्ये आहेत. त्यामुळे भाषांतर करताना संस्कृत भावार्थ लक्षात घेवुन त्याचा अर्थ स्वीकारला पाहिजे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
जन्ममृत्यु जराव्याधि दुःख दोषानु दर्शनम् ॥९॥ गीता
जरा व्याधी म्हणजे रोग व्याधी निवारण करण्यासाठी आयुर्वेद शास्त्रग्रंथात रोगांची विविध नावे आहे. भारतीय संस्कृतीत मातृकापूजन हे पुर्वावार चालत आलेले आहे. जन्म आणि मृत्यु याचे नियंत्रण कोणत्यातरी शक्तीच्या हाती आहेत आणि या शक्तीची उपासना केली तर मृत्युपासुन दूर राहू शकतो. आई शिवाय आपल्या मुलांचे हित कोणी पाहू शकत नाही. त्यामुळे या शक्तीला मातृदेवता म्हणून पुजन केले जात असे. सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये अनेक मातृदेवतांच्या मातीच्या मूर्ती आढळून आल्या आहेत. ( Shravan Month Nag Panchami Festival Nag Narasoba Photo Jara Jivantika Pujan Read Information in Marathi )
पुढे हि कल्पना विस्तारुन सप्तमातृका ज्या सात प्रमुख देवतांच्या शक्ती आहेत, त्यांचे पुजन सुरु झाले. देवता पुरुष स्वरुपात आणि त्याची शक्ती ही स्त्रीरुपात दर्शवली जाते. यक्ष यक्षीणी ही कल्पना पुढच्या काळात जास्त मोठया प्रमाणात विकसीत झाली. आगदी बौध्द आणि जैन धर्मीयांनी सुध्दा ती स्वीकारली. बौध्द साहित्यात हारीती नावाची यक्षीनी मुलांना खात असे. पुढे ती मुलांचे रक्षणकर्ती झाली असे दाखले आहेत. तर बदामीच्या चालुक्य राजांनी एक लेख कोरून घेतला आहे. या लेखात ते हारीतीचे वंशज असून, त्यांचे संगोपन-संवर्धन सप्त मातृकांनी केल्याचा उल्लेख आहे. तो असा : ‘हारीती-पुत्रनाम्सप्तमातृभिरभिवर्धितानाम्’ प्रमाणे केला आहे. ही हारीती कुबेराची पत्नी आहे.
अनेक यक्षीकां पैकी अंबिका यक्षी ही मुलांचे रक्षणकर्ती यक्षी म्हणून पुजण्यात येते. अजिंठा वेरुळ मध्ये या देवतांचं अंकन केले आहे. पूर्वी लहानमुलांमध्ये साथीचे रोगामुळे मृत्युच प्रमाण मोठे होते. औषधांची माहिती सगळ्यांना उपलब्ध नव्हती. त्यामुळे अश्या कोणत्यातरी देवतेची उपासना केली की मुलांचे जीव वाचवले जातील, या कल्पनेतुन जीवदान देणारी देवता “जिवंतीका” जी मुळची मातृदेवता होती तीची पुजा करण्याची प्रथा सुरु आहे.
नरसिंह ही देवता भक्त प्रल्हादाशी निगडीत आहेत. प्रल्हाद त्याच्याच कृपेने नाना आघातांपासून वाचला तसा आपली ही मुले वाचावीतच, हा भाव या मागे आहे. कालियादर्मन करणाराकृष्ण – कृष्णजन्म याच महिन्यात असतो. त्याच बरोबर तो गोपाळ आहे. त्यांने सोबत राहून अनेक गोपालाचे रक्षण केले आहे. तो कृष्ण आपल्या मुलांचा सोबत राहून त्यांचे रक्षण करो, यासाठी कृष्ण पुजन आहे.
हेही वाचा – उपवास म्हणजे काय? तो का आणि कसा करावा? अधिक मास अन् श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने वाचावा असा लेख
नागवंशीय समाज हा पुर्णत: वेगळा होता त्यांच्या कडे नागपूजा चालत होती. महाविलयन प्रक्रियेत त्यांचा समावेश केल्या पासून नागपूजन केले जावु लागले. नागपंचमी हा सण ही श्रावणात येतो. त्याचे स्वतंत्र व्रत आहे. बुध आणि गुरु पुजन – ज्योतिष शास्रागुप्रमाणे बुध हा बुद्धीचा कारक आणि गुरु हा ब्रहसपती म्हणजे देवांचा गुरु आहे. नाना शास्त्र, विद्या या गुरुच्या उपासना मुळे प्राप्त होतात. त्यांची वाहने म्हणजे प्रतिके ही हत्ती व वाघ ही सामर्थ्याची लक्षणे आहेत. आपली मुले ही याच्या प्रमाणे होण्यासाठी त्याचा आदर्श या पुजनाच्या निमित्ताने घातला आहे.
आघाडा व दुर्वा – धर्म आणि विज्ञान एकत्रित करण्याची भारतीय परंपरा येथे पहावयास मिळते दोन्ही वनस्पती या औषधी आहेत. आघाडा – या वनस्पती आयुर्वेदात अपामार्ग असे म्हणतात. ही वनस्पती फक्त पावसाळ्यात पहावयास मिळते. ही बहुगुणी वनस्पती असून अनेक रोगांवर याचा उपयोग होतो. मस्तीकरोग – ज्यात स्मरणशक्ती कमकुवत होणे सारखा रोग, दात, डोळ्यांचे रोग, मुत्रविकार, पोटदुखी सारख्या रोगांवर याचा रामबाण उपाय असतो. आजीबाईच्या बटव्यामधील महत्वाची वनस्पती सगळयांना ओळखता यावी, यासाठी या पुजनात त्याचा उपयोग केला आहे. लहान मुलांच्या रोगामध्ये याचा काढा दिला जात असे.
एकंदरीत जन्मजात शिशु ते कुमारवयातील मुलासाठी आईने मायेने करावयाचे व्रत हे जीवंतिकेचे व्रत आहे. शेवटी भारतीय परंपरेत मातृशक्तीचे महत्व सर्वात जास्त आहे. आगदी आपण आपल्या देशाला भारतामाता म्हणतो. शास्त्र आणि श्रध्दा याचा संगम असलेले आपले सण आणि व्रते मुळ उद्देश समजून साजरे केले पाहिजेत. ( Shravan Month Nag Panchami Festival Nag Narasoba Photo Jara Jivantika Pujan Read Information in Marathi )
लेखक – अजित दि देशपांडे (संतविचार अध्यासन)
अधिक वाचा –
– प्राथमिक शाळेत मुलांना मिळणार संगणक विद्या, इंदोरीतील दोन शाळांना संगणक संच भेट । Maval News
– तळेगाव दाभाडे शहराला आंद्रा धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा ; अजित पवारांनी मागवला अहवला । Maval News
– मोठी बातमी ! आदिवासीबहुल गावांमध्ये आदिवासी दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर, मावळातील गावांचा समावेश