पुणे जिल्हा नियोजन समितीची आढवा आणि नियोजन बैठक शुक्रवार (दिनांक 27 जानेवारी) रोजी संपन्न झाली. या बैठकीला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नियोजन समिती सदस्य, अधिकारी वर्ग आदीजन उपस्थित होते. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके, माजी आमदार आणि नियोजन समितीचे सदस्य बाळा भेगडे देखील या बैठकीला विधान भवन पुणे येथे उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर बैठकीत मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेले वडगांव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थान आणि तळेगांव दाभाडे नगरीचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज देवस्थान या दोन्ही तीर्थ स्थळांना जिल्हा नियोजन समितीने ‘क-वर्ग’ तीर्थक्षेत्र स्थळाचा दर्जा दिला. तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट आणि संत श्री जगनाडे महाराज समाधी परिसर सुदुंबरे तीर्थक्षेत्र आराखडा शासनाला सादर करण्याचे निर्देश दिले. ( Shree Potoba Maharaj Devasthan Vadgaon Maval And Shree Dolasnath Maharaj Devasthan Talegaon Dabhade Accorded C-Class Pilgrimage Status )
क – वर्ग दर्जा धार्मिक स्थळ…
धार्मिक स्थळांचा समावेश तीन प्रकारच्या वर्गात होतो, अ-वर्ग, ब-वर्ग आणि क-वर्ग. ‘क’ श्रेणीत जिल्हा स्तरावर स्थानिक महत्त्व असलेली ठिकाणांना निर्देशित करण्यात येतात. जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या मदतीने आशा ठिकाणांना निधी दिला जातो, अशांना या श्रेणीत प्राधान्य दिले जाते.
अधिक वाचा –
– माजी मंत्री बाळा भेगडे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड; पाहा नवनियुक्त 20 सदस्यांची संपूर्ण यादी
– शिवसेवा प्रतिष्ठानकडून लोणावळा शहरातील 8 शाळांना प्राचीन भारताचा नकाशा भेट