जैन धर्मीयांचे तीर्थक्षेत्र असलेल्या झारखंडमधील श्री सम्मेद शिखर या स्थळाला पर्यटन क्षेत्र घोषित करण्याच्या निर्णयाच्या विरोधात तसेच गुजरातमधील पवित्र तीर्थक्षेत्र श्री शत्रूंजय तीर्थ पालीथानाचे पावित्र्य भंग करणाऱ्या समाजकंटकांच्या निषेधार्थ मावळ तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. तसेच देशभरातही अनेक ठिकाणी आंदोन, मोर्चे झाले होते. वडगाव शहरातील जैन समाजाच्या वतीने बुधवारी सर्व व्यवहार बंद ठेऊन निषेध मोर्चा काढण्यात आला होता. अखेर जैन बांधवांच्या आक्रमक पवित्र्यापुढे सरकार झुकले आहे. ( Shree Sammed Shikharji Pilgrimage Finally Canceled Status Of Tourist Spot Jharkhand Government )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
…अखेर पर्यटनस्थळाचा दर्जा रद्द
झारखंड येथील गिरिदीह येथे जैन समाजाच्या आदरस्थानी असलेल्या श्री सम्मेद शिखरजी या विश्वविख्यात पवित्र स्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय झारखंड सरकारने अखेर रद्द केला. त्यामुळे श्री सम्मेद शिखरजीचा तीर्थस्थळाचा दर्जा आता कायम राहणार आहे. या स्थळाबाबत जैन समाजाने दिलेल्या प्रखर लढ्यापुढे झारखंड सरकार झुकले आहे. झारखंडचे पर्यटनमंत्री हफीजुल हसन अन्सारी यांनी सांगितले की, जनतेच्या भावना लक्षात घेऊन श्री सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. श्री सम्मेद शिखरजीला तीर्थस्थळाचा असलेला दर्जा कायम राहील, असेही ते म्हणाले.
अधिक वाचा –
– ‘निधी देणार नसाल तर तसं सांगा, जाहीर सत्कार करतो’, तालुक्यातील विविध मागण्यांसाठी आमदार शेळके आक्रमक – व्हिडिओ
– नाताळ, थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून पवना कॅम्पिंग चालक-मालक यांची बैठक, नियम पाळण्याची ताकीद