Dainik Maval News : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाकड येथे महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात कारखान्याची निवडणूक सहमतीने बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
माजी खासदार व कारखान्याचे अध्यक्ष विदुरा नवले यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, माजी खासदार अशोक मोहोळ, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार बाबाजी काळे आदी उपस्थित होते. बैठकीत कारखान्याच्या निवडणुकीसाठी एकमताने निर्णय घेण्यावर भर देण्यात आला.
- खासदार श्रीरंग बारणे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. त्यानुसार शनिवारी (दि. २२) सकाळी दहा वाजता वाकड येथील श्री संत तुकाराम मंगल कार्यालयात सर्व इच्छुक उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवारांना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीच्या माध्यमातून निवडणुकीची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.
यंदाची निवडणूक सर्वपक्षीय सहमतीने आणि एकमताने पार पडावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. २२ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीला सर्व उमेदवारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीतून निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेसाठी स्पष्ट दिशा मिळेल आणि संघटित सहकाराच्या बळावर कारखान्याचा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अर्थसंकल्पात घोषणा होते, पण वर्षानुवर्षे काम होत नाही ; तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्रॅकसाठी तातडीने भूसंपादन करा
– तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील अतिक्रमणे ‘पीएमआरडीए’च्या रडारवर ; कारवाईस प्रारंभ
– तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक ; एसीबीच्या पथकाची कारवाई