Dainik Maval News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व सिद्धांत कॉलेज ऑफ फार्मसी सुदुंबरे यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर दिनांक ११ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत विविध सामाजिक उपक्रमांसह वहानगाव (ता.मावळ) येथे पार पडले.
यावेळी शिबिरार्थींनी योगा, प्राणायाम, प्रार्थना, ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, ग्रामसर्वेक्षण, ऐतिहासिक स्थळे जपण्यासाठी जनजागृती केली. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन, शेतकरी, सर्प समज-गैरसमज, महिला सबलीकरण या विषयांवर विद्यार्थ्यांनी पथ नाट्य सादर करत सामाजिक प्रबोधन केले.
- गावच्या विकासात तरुणांचे योगदान, विकसित भारत समर्थ भारत, महिलांचे स्वास्थ्य, डिजिटल साक्षरता या विषयावर व्याख्याने झाली. विशेषतः गावकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर (पायोनियर हॉस्पिटल च्या सहयोगाने) आणी नेत्र तपासणी शिबिर (साई ऑप्टिकल च्या साहाय्याने) आयोजित केले होते.
शिबिराच्या समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वाती देशमुख, रजिस्ट्रार नवनाथ गाडे तसेच रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वाती काळे, प्रा. ज्ञानेश्वरी चोपडे, जयवंत बोरकर, महेंद्र चव्हाण, बळीराम वाडेकर (उपसरपंच), उमेश वाडेकर (अध्यक्ष शाळा समिती), काळूराम वाडेकर (अध्यक्ष, भैरवनाथ विद्यालय समिती), विठ्ठल वाडेकर, तानाजी शिंदे (मुख्याध्यापक), विनय कसबेकर (मुख्याध्यापक, भैरवनाथ विद्यालय) तसेच ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व अन्य ग्राम सदस्य उपस्थित होते
कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वाती काळे यांनी शिबिर कामकाज अहवाल वाचन केले आणि राष्ट्रीय सेवा योजना सेवक श्रियोग सुरोशी व शिवानी हिंगवार यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धी माने यांनी आभार मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News
– तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश

