Dainik Maval News : मावळ तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी सध्या चिंतेच्या गर्तेत अडकला आहे. खरिप हंगामाच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने दैना केल्यानंतर कशीतरी भात पिकांची लागवड करण्यात आली होती. यंदा भात पिकाचा पेरा देखील कमी झाला होता. परंतु आता हेच भात पीक हाताशी आले असता पुन्हा आस्मानी संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.
मावळ तालुक्यातील शेतकरी सध्या बदललेल्या वातावरणाचा सामना करीत आहे. तसेच मागील दोन तीन दिवसांपासून विविध भागात पाऊस पडत आहे. मावळ तालुक्यात सध्या भाताचे पीक काढणीस आले आहे. तर काही ठिकाणी भात पिकाची काढणी सुरू आहे. अशात पाऊस कोसळल्यामुळे भात पिकाचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
मावळात यंदा भात पिकाचा पेरा कमी झाला होता. जवळपास १२ हजार हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड झाली. साधारण हजार हेक्टर क्षेत्रावर कमी लागवड झाली. वातावरणीय बदल, रोगराईचा सामना करीत आता कुठे भात पिक हाताशी आले आहे. अशात वातावरण बदल होऊन पावसाची चाहूल लागल्याने भात उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. पाऊस किंवा ढगाळ वातावरणात भाताचा दाणा योग्य रित्या परिपक्व होत नाही, त्याचा परिणाम उत्पादकतेवर होतो.
त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या उन्हाची आणि उघडीपीची अपेक्षा आहे. सोबत भात काढल्यानंतर इंद्रायणी तांदुळाचा चांगला भाव मिळण्याचीही अपेक्षा शेतकरी वर्ग अपेक्षित करीत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगावचे नवीन पोलीस निरिक्षक अभिजित देशमुख यांची धडाकेबाज कामगिरी ; डोणे गावातील अवैध दारूभट्टी केली उध्वस्त
– मुरलीधर मोहोळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची ऑफर… काय आहे किस्सा ? वाचा सविस्तर । Murlidhar Mohol
– भरधाव वॅगनर कारच्या धडकेत गंभीर जखमी होऊन 78 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ; शिरगाव पोलिसांत चालकावर गुन्हा दाखल




