पीडीसीसी बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक यांचा नाशिक येथील सह्याद्री फार्म्स येथे शेतकरी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार सुनिल शेळके यांचीही उपस्थिती होती. शेतकरी एकत्र आले व त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर त्या शेतकऱ्यांचे जीवनमान कसे उंचावू शकते याचे योग्य उदाहरण म्हणजे सह्याद्री फार्म्स. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन एकत्रितपणे काम केल्यास शेतीसारखे दुसरे उत्पन्नाचे साधन नाही हे सह्याद्री फार्म्सने उभारलेल्या उद्योगातुन दिसुन येते. सह्याद्री फार्मचे सुमारे 100 एकरावरील मुख्यालय आणि तिथे विकसित करण्यात आलेली शेतमालाची प्रक्रिया, पॅकेजिंग यंत्रणा खरंच कौतुकास्पद असुन 11000 पेक्षा अधिक शेतकरी या कंपनीशी जोडले गेले आहेत. जगभरातील 42 देशांत या ब्रँडचा शेतमाल स्वीकारला जात आहे. सह्याद्रीच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे आमदार सुनिल शेळके म्हणाले.
मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी देखील आधुनिक शेतीची कास धरल्यास आर्थिक विकास होण्यास नक्कीच मदत होईल. बदलत्या शेतीचा वेध घेऊन नवे काही करण्याचा ध्यास शेतकऱ्यांनी बाळगला पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन ज्ञान व तंत्रज्ञानाची देवाण घेवाण करीत वाटचाल करायला हवी, अशी अपेक्षा आमदार शेळके यांनी व्यक्त केली. ( Society Director from Maval visited Sahyadri Farms Nashik under guidance of Mauli Dabhade )
अधिक वाचा –
– उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार
– यंदा गुलाल उधळायचाच..! ग्रामपंचायत निवडणूक : मावळ तालुक्यात सरपंच पदाच्या 21 जागांसाठी तब्बल 117 अर्ज, वाचा गावनिहाय आकडेवारी
– अडीच वर्षीय बालकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न, पित्याच्या प्रसंगावधानाने बचावला लेक, तळेगावातील धक्कादायक घटना