Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड शहर आणि हद्दीतील मार्गावर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील अवजड वाहनांवरील बंदीचा कालावधी आता 2 तासांनी वाढविण्यात आला आहे.
यापूर्वी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत अशी बंदी अवजड वाहनांना होती. आता ही वेळ वाढवून सकाळी 8 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत अशी करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये चाकण, भोसरी, महाळुंगे, तळेगाव दाभाडे, हिंजवडी, तळवडे, वाकड, देहू रोड आणि आळंदी यांसारख्या अनेक भागांमध्ये नागरिकांनी वाहतूक कोंडीच्या वारंवार तक्रारी केल्या होत्या.
याशिवाय जुना मुंबई-पुणे महामार्ग, कात्रज-देहू रोड बायपास आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे वाहतुकीची समस्या अधिक गंभीर झाली असून नागरिकांना रोजच्या प्रवासात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेच्या म्हणण्यानुसार, अवजड आणि हळू चालणाऱ्या वाहनांवर बंदीची वेळ वाढवल्यामुळे शहरातील वाहतुकीची स्थिती सुधारण्यास मदत होईल. त्यामुळेच अवजड वाहनांवरील बंदीची वेळ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात आमसभा आयोजित करण्याची मागणी ; शिवसेनेकडून प्रशासनाला निवेदन । Maval News
– वडगावातील तरूणाईत वाढत्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे ; पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी
– पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी बिगर कर्जदार आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या