मंगळवार (1 नोव्हेंबर) रोजी वडगाव मावळ ( Vadgaon Maval ) येथे मावळ तालुका भारतीय जनता पार्टी ची ( Bharatiya Janata Party ) मासिक आढावा बैठक पार पडली. यावेळी सोमनाथ बोडके ( Somnath Bodake ) यांची सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पवन मावळ ( Pavan Maval ) भाजपा विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसेच, यावेळी मावळ तालुका खादी ग्राम उद्योग संचालक पदी पत्रकार सुदेश गिरमे आणि गणेश भांगरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ( Somnath Bodke Elected Vice President of Pavan Maval BJP Student Alliance )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, ज्येष्ठ नेते शांताराम काजळे, माऊली शिंदे, राजाराम शिंदे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम,सरचिटणीस सुनिल चव्हाण, मच्छिंद्र केदारी, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, वडगाव शहर अध्यक्ष अनंता भाऊ कुडे, संतोष कुंभार, किरण राक्षे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, सोशल मीडिया आघाडी अध्यक्ष सागर शिंदे, दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे यांच्यासह भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करा, अन्यथा आंदोलन करावे लागेल; वडगाव भाजपाचे निवेदन
– ठाकुरसाई – गेव्हंडे खडक ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अरविंद रोकडे, 5-3च्या फरकाने मारली बाजी