राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या फुटीच्या उंबरठ्यावर आहे. काल रविवारी (दिनांक 2 जुलै) रोजी झालेल्या राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादीत अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. यात प्रामुख्याने शिवसेना दुभंगत असताना ज्या ज्या घडामोडी घडल्या तशाच गोष्टी राष्ट्रवादी बाबत होताना दिसत आहेत. ( Sonia Doohan will be charge of Nationalist congress party New Delhi central office Said Sharad Pawar )
राष्ट्रवादी पक्षाची दोन शकले होताना दिसत असून यातूनच पक्ष, चिन्ह, नाव आणि कार्यालये यांसह नेते-पदाधिकारी यांना आपल्याकडे खेचण्याची घाई होताना दिसत आहे. यातच मागील अनेक वर्षे दिल्लीचं राजकारण जवळून पाहिलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत एक महत्वाचा बदल केला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शरद पवार यांनी दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची जबाबदारी अत्यंत विश्वासू नेत्याकडे सोपवली आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर एक नियुक्ती पत्र पोस्ट करत ही घोषणा केली आहे. त्यानुसार, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व जनतेला आणि पदाधिकाऱ्यांना सूचित करण्यात येते की, आजपासून सुश्री सोनिया दुहान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नवी दिल्ली मध्यवर्ती कार्यालयाचा कार्यभार सांभाळणार आहेत.” असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
It is hereby notified all public and office bearers of NCP that from today Ms. Sonia Doohan will be charge of Nationalist congress party, New Delhi central office.@DoohanSonia pic.twitter.com/qfl7zANwmG
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 3, 2023
कोण आहेत सोनिया दुहान?
सोनिया दुहान या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. तसंच त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याही आहेत. सोनिया दुहान या हरियाणामधल्या हिसारच्या रहिवासी आहेत. त्यांच्या तीन भावंडांमध्ये त्या सगळ्यात मोठ्या आहेत. हिसारमध्ये सोनिया दुहान यांनी शालेय शिक्षण घेतलं आहे. यानंतर कुरुक्षेत्र विद्यापीठातून Bsc. केलं आहे. त्यानंतर त्या अंबाला या ठिकाणी आल्या. वैमानिक म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांचं वास्तव्य पुण्यात होतं. त्यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आल्या. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019 ला पहाटेच्या शपथविधी वेळी त्यांनी राष्ट्रवादीतील फुट रोखल्याने त्या शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू बनल्या.
अधिक वाचा –
– टाकवेत रविंद्र भेगडेंच्या उपस्थितीत बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख आणि विभागातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांची टिफीन बैठक
– ‘मी उद्यापासून बाहेर पडणार..लोकांमध्ये जाऊन भुमिका मांडणार..पक्षाबद्दल कुणी काही दावा केला तरी भांडत बसणार नाही’ – शरद पवार