व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘I Nilesh Lanke..’ कमालच झाली ! निलेश लंकेंनी थेट इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ, सुजय विखेंना कृतीतून प्रत्युत्तर – पाहा Video

निलेश लंके यांनी सभागृहात पाऊल ठेवताच पहिल्याच दिवशी आपले विरोधक सुजय विखे पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 25, 2024
in महाराष्ट्र, देश-विदेश, व्हिडिओ
Nilesh Lanke Took oath In English In Parliament

Photo Courtesy : Team Dainik Maval


दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी आज (दि. 25 जून) खासदारकीची शपथ घेतली. नव्या संसद भवनातील निलेश लंके यांचा आज पहिला दिवस होता. संसदेच्या पायरीवर नतमस्तक होत निलेश लंके यांनी संसदेत प्रवेश केला. संसदेत सध्या 18 व्या लोकसभेसाठी निवडून आलेल्या सदस्यांचा अर्थात खासदारांचा शपथविधी सोहळा सुरू आहे. या दरम्यान निलेश लंके यांनी देखील खासदारकीची शपथ घेतली. परंतू आश्चर्याची बाब म्हणजे निलेश लंके यांनी थेट इंग्रजीतून आपल्या सदस्यत्वाची शपथ घेतली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

निलेश लंके यांनी सभागृहात पाऊल ठेवताच पहिल्याच दिवशी आपले विरोधक सुजय विखे पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दक्षिण अहमदनगर लोकसभेची निवडणूक यंदा अतिशय चुरशीची झाली. येथे गेल्या अनेक दशकांची विखे-पाटील घराण्याची असलेली सत्ता निलेश लंके यांनी मोडून काढली. भाजपाच्या तिकीटावर दुसऱ्यांदा खासदारकीसाठी उभे राहिलेले डॉ सुजय विखे पाटील यांचा पहिल्यांदाच तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या निलेश लंके यांनी दणदणीत पराभव केला. परंतू नगरची हि निवडणूक अनेक मुद्द्यांनी गाजली. त्यातही एक मुद्दा जास्त वेळ चर्चेला गेला होता, तो म्हणजे उमेदवारांचे शिक्षण. ( South Ahmednagar Lok Sabha Constituency MP Nilesh Lanke Took oath In English In Parliament Watch Video )

डॉ. सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्या शिक्षणाचा मुद्दा पुढे करत त्यांना इंग्रजीतून भाषण करण्याचे आव्हान दिले होते. त्यांनी महिनाभर वेळ घ्यावा, पाठांतर करावे आणि बोलून दाखवावे, असे आव्हान विखे यांनी दिले होते. विखेंच्या त्या आव्हानाला लंकेंनी प्रचारादरम्यान सौम्य शब्दात प्रत्युत्तर दिलेही होते. ‘समोरच्या उमेदवाराने माझ्यासोबत इंग्रजीतून भाषण करण्याची स्पर्धा लावली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली आहे. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान हवा. संसदेत खासदाराला आपल्या भाषेतून बोलता येते. तुम्ही कोणत्या भाषेत बोलता यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांची, सर्वसामान्य लोकांची किती बाजू लावून धरता हे महत्वाचे आहे. इंग्रजीतून बोलणे महत्वाचे नाही. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी संसदेत मराठी माणसाचा आवाज उठविला. आपल्या जिल्ह्यातील दिवंगत नेते बबनराव ढाकणे यांचेही शिक्षण कमीच होते,’ असे प्रत्युत्तर देत निलेश लंके यांनी प्रचारादरम्यान आपली बाजू सावरून धरली होती.

लोकसभा निवडणूकीत सुजय विखे-पाटील यांना 28 हजार मतांनी हरवत निलेश लंके यांनी मोठा विजय संपादित केला. त्यानंतर मंगळवारी (दिनांक 25 जून) त्यांनी लोकसभेत पहिले पाऊल ठेवले. यावेळी त्यांनी खासदारकीची सदस्यत्वाची शपथ घेत असताना सर्वांनाच अचंबित केले. निलेश लंके यांनी थेट इंग्रजीत आपल्या सदस्यत्वाची शपथ घेतली. लंके यांची ही कृती म्हणजे डॉ. सुजय विखे पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर असल्याचे बोलले जात आहे.

जिंकलस भावा ! @Nilesh_LankeMLA
Don’t underestimate the Power of Common man!
And yes, You can talk English, walk English.. English is a funny language ! pic.twitter.com/kae7Rqm6Fe

— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) June 25, 2024

दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी आज (दि. 25 जून) खासदारकीची शपथ घेतली. परंतू आश्चर्याची बाब म्हणजे निलेश लंके यांनी थेट इंग्रजीतून आपल्या सदस्यत्वाची शपथ घेतली. @Nilesh_LankeMLA #nileshlanke #निलेशलंके #लंके #lanke #अहमदनगर pic.twitter.com/DZUg3YLwo4

— Dainik Maval दैनिक मावळ (@DainikMaval) June 25, 2024

सुजय विखेंनी इंग्रजीवरून लंकेना हिनवले होते,
निलेश लंकेनी आज खासदारकीची शपथ इंग्रजीत घेऊन सुजय विखेला उत्तर दिलाय.. pic.twitter.com/iY293bIw5d

— Pratik S Patil (@Liberal_India1) June 25, 2024

अधिक वाचा –
– इंदोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप नाटक यांची बिनविरोध निवड । Maval News
– 1972 साली धरण झाले, 7 आमदार झाले, मात्र पवना धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागायला 2024 साल उजाडले । Pavana Dam
– पुणे रिंगरोड बाबत महत्वाची बातमी ! ‘एमएसआरडीसी’कडून प्रकल्पाबाबत महत्वाची अपडेट समोर । Pune Ring Road

 


Previous Post

येळसे गावात भात लागवडीस सुरूवात, मावळ कृषि विभागाच्या कृषि संजिवनी मोहिमेला यश । Maval News

Next Post

वाढदिवसानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेत शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Distribution of school material

वाढदिवसानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेत शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pimpri-Chinchwad Police Commissioner orders action against those illegally filling commercial gas tanks

अवैधरित्या व्यावसायिक गॅस टाक्या भरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचे आदेश

March 14, 2026
Minister Madhuri Misal MLA Sunil Shelke regarding issues within Dehu Road Cantonment Board area

देहूरोड कॅन्टोन्मेंटमधील नागरी सुविधांच्या प्रश्नावर केंद्राकडे पाठपुरावा सुरू ; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

March 14, 2026
Yewalewadi village in Maval taluka without cemetery smashan bhumi funeral has to be held in open

ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नाही, तिथे विशेष मोहीम राबवून जागा उपलब्ध करून देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

March 14, 2026
Demand to speed up third and fourth tracks of Pune-Lonavala railway after substantial provisions in budget

राज्य शासनाने अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदीनंतर पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला रेल्वे मंत्रालयाने गती देण्याची मागणी

March 14, 2026
PM-Kisan-Samman-Nidhi

गुडन्यूज ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित, महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना १ हजार ८३७ कोटींचे वितरण

March 14, 2026
Rain

राज्यात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.