Dainik Maval News : भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने गाव भेट दौरा सुरू आहे. गाव भेट दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी आंदर मावळ भागातील गावांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी गावा गावात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने आलेल्या पदाधिकाऱ्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
काहीही झाले तरी , माघार घ्यायची नाही .मावळ विधानसभा लढवायची असा चंगच जणू , भारतीय जनता पार्टीने बांधला आहे. त्यादृष्टीने भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री बाळा भेगडे व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे , भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे हे भाजपचे तीनही प्रमुख नेते गाव भेट दौऱ्यात सहभागी असल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.
यामुळे येणाऱ्या काळात “आपल मावळ आपलं कमळ” “आता माघार नाही” “आमचं ठरलंय” या भूमिकेवर कार्यकर्ते अग्रेसर असून येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या वतीने मावळ विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभा केला जाईल तो निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते जीवाचे रान करतील अशी भूमिका गावागावातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या गावभेट दौऱ्यानिमित्त नेत्यांच्या कानावर घातल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे विद्यमान आमदारांच्या गोटात चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
तसेच गाव भेट दौऱ्यात कार्यकर्त्यांच्या मगिणीला प्रतिसाद देताना , “गावातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला बूथ जिंकण्यासाठी आजपासून जोमाने कामाला लागावे” अशा सूचना देखील नेत्यांनी या गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. या गावभेट दौऱ्यात , सावळा , निळशी , खांडी , कुसूर , बेंदेवाडी , डाहुली , कांब्रे , बोरवली , कुसवली , वहाणगाव , नागथली , शिंदेवाडी , वडेश्वर , माऊ , फळणे , टाकवे (बु.) या गावांना भेटी दिल्या.
याप्रसंगी दत्तात्रय गुंड, निवृत्ती शेटे, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, बाळासाहेब घोटकूले, नितीन मराठे, रोहिदास असवले, अभिमन्यू शिंदे, गणेश कल्हाटकर , अरुण कुटे , संपत कदम, सुभाष देशमुख, विश्वनाथ जाधव, रवि आंद्रे, अभिजीत नाटक, उमेश पिंगळे, रामदास आलम, सुरेश आलम, किरण जगताप, प्रणेश नेवाळे, बाळासाहेब शिंदे, संभाजी देशमुख यांच्यासह भाजपा चे सर्व गावातील प्रमुख पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! संपूर्ण मावळवासियांना प्रतिक्षा असलेल्या कान्हे उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण लवकरच । Maval News
– पवन मावळ विभागात भातशेतीवर करपा, कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव ; शास्त्रज्ञांनी घेतला आढावा । Maval News
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून सप्टेंबर दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे