दुबई येथे झालेल्या आशिया चषक 2022 या स्पर्धेचा निकाल लागला आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन तुल्यबळ संघात झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा दणदणीत पराभव ( Sri Lanka Beat Pakistan ) केला आहे. यासह श्रीलंका संघाने 15व्या आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद ( Asia Cup Title 2022 ) पटकावले आहे. महत्वाचे म्हणजे श्रीलंका संघाचे हे सहावे आशिया चषक जेतेपद आहे. ( Sri Lanka Win Asia Cup Title )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आशिया चषक 2022 चा अंतिम सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या दरम्यान खेळला गेला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने पाकिस्तानसमोर विजयासाठी 171 धावांचे आव्हान दिले होते.
Sri Lanka ???????????? the #AsiaCup2022 ????
Scorecard: https://t.co/xA1vz7cSW0 pic.twitter.com/IL3DaXmwIs
— ICC (@ICC) September 11, 2022
मात्र, एक एक करुन पाकिस्तानचे खेळाडू बाद होत राहिले. त्यामुळे पाकिस्तान 20 षटकात सर्वबाद अवघ्या 147 धावा करु शकला. यासह 23 धावांनी शानदार विजय मिळवत श्रीलंकेने आशिया चषक आपल्या नावे केला. भानुका राजपक्षे व वनिंदू हसरंगा हे श्रीलंकेच्या विजयाचे नायक ठरले. ( Sri Lanka Beat Pakistan By 23 Runs To Win Asia Cup Title 2022 )
अधिक वाचा –
डायमंड लीग : ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने रचला इतिहास, सोन्यानंतर आता जिंकला हिरा!
@71 डन..!! विराट कोहलीच्या कोट्यवधी चाहत्यांना गुडन्यूज! तब्बल 1020 दिवसांची प्रतिक्षा संपली