मावळ लोकसभेचे संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 20 जणांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.
श्रीरंगआप्पा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष धनाजी बारणे, उपाध्यक्ष रवी नामदे, सचिव बशीर सुतार यांनी याबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. ( Srirangappa Barane Social Foundation Awards Announced On Occasion Of Maval Lok Sabha MP Shrirang Barne Birthday )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात 16 फेब्रुवारी रोजी पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार आहे. अमित गोरखे यांना शिक्षण रत्न, मुकुंद कुचेकर यांना समाजभूषण, डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांना कला गौरव, सुर्यकांत मूथियान -पर्यावरण भूषण, वसंत काटे- उद्योगरत्न, माया रणवरे- दुर्गारत्न, डॉ. नारायण सुरवसे- सेवाभूषण, प्रा. सुनिता नवले-दुर्गारत्न, विजयन -शिक्षणरत्न, शेखर कुटे-वारकरी भूषण, संगीता तरडे-दुर्गारत्न, अमरसिंह निकम-आरोग्य भूषण, वृशाली मरळ- आधारभूषण, संतोष कनसे-श्रमिक भूषण, आलम शेख, भगवान मुळे -समाजभूषण, जयदेव म्हमाणे -क्रीडारत्न, प्रमोद शिवतरे -समाजभूषण, अनिल साळुंखे-समाजरत्न आणि शुंभकर को-हौसिंग सोसायटीला आदर्श भूषण सोसायटी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
अधिक वाचा –
– राष्ट्रीय लोक अदालतीत 78 हजार प्रलंबित दावे निकाली, पुणे जिल्हा सलग नवव्यांदा राज्यात प्रथम
– नील सोमय्यांच्या उपस्थितीत वडगावात माफक दरात श्रवणयंत्र वाटप, शहर भाजपा आणि युवक प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम