इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेची तयारी करत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्य बोर्डाने यंदा दहावी बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार करण्याचा विडा उचलला असून त्यासाठी अनेक उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बोर्डाने विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका 10 मिनिटे अगोदर देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच दुसरीकडे आता परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत उशीरा आलेल्या विद्यार्थ्यानाही परीक्षेला बसण्याची दिली जाणारी परवानगी बंद करण्याचा मोठा निर्णय बोर्डाने घेतला आहे. याचाच अर्थ आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळा तंतोतंत पाळाव्या लागणार आहेत आणि पेपर सुरु होण्यापूर्वीच परीक्षा केंद्रावर हजर राहणे बंधनकारक असणार आहे. ( SSC And HSC Board Exam Students Who Come Late Will Not Be Allowed To Appear In Examination )
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेबाबत महत्वाची माहिती ;
परीक्षेसाठी नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी – 32 लाख
एकूण परीक्षा केंद्रे – 8000
बारावी बोर्ड परीक्षेचा पहिला पेपर – 21 फेब्रुवारी
दहावी बोर्ड परीक्षेचा पहिला पेपर – 2 मार्च
अधिक वाचा –
– नील सोमय्यांच्या उपस्थितीत वडगावात माफक दरात श्रवणयंत्र वाटप, शहर भाजपा आणि युवक प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
– महाराष्ट्रच नव्हे तर राष्ट्रपतींनी 12 राज्यांचे राज्यपाल आणि 1 केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल बदलले, पाहा यादी