पवनानगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज (शुक्रवार, २ जून ) जाहीर झाला आहे. पवन मावळ भागातील पवनानगर इथे असणाऱ्या पवना शिक्षण संकुलातील पवना विद्या मंदिर शाळेचा निकाल यंदा ९८.३४ टक्के इतका लागला आहे. ( ssc result 2023 declared )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मळवंढी ठुले येथील ग्रामीण भागात राहणारा रितेश पांडुरंग ठुले हा विद्यार्थी ९३ टक्के गुण मिळवत शाळेत पहिला आला आहे. तर द्वितीय क्रमांक प्रणाली बबन घरदाळे ९२.६० टक्के, व तृतीय क्रमांक दिक्षा गोपाळ तुपे हिने ८९.६० टक्के मार्क मिळवले आहे. तसेच इतर सर्व विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवत पवना शिक्षण संकुलाची चांगल्या निकालची परांपरा कायम ठेवली आहे. ( pavana vidya mandir school 10th Result 98.34 percent )
क्रमांक १ – रितेश ठुले – ९३ टक्के
क्रमांक २ – प्रणाली घरदाळे – ९२.६० टक्के
क्रमांक ३ – साक्षी तुपे – ८९.६०
सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे वर्गशिक्षक वैशाली वराडे, महादेव ढाकणे, मंजुषा गुजर, रोशनी मराडे, बापुसाहेब पवार, राजकुमार वरघडे, भारत काळे, सुनील बोरुडे, संजय हुलावळे, गणपत ठोंबरे, सुनिता कळमकर व सर्व मार्गदर्शक अध्यापकांचे अभिनंदन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय भेगडे, संस्थेचे सचिव व पवना शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे, प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका निला केसकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.
अधिक वाचा –
– अभिनंदन..! दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 93.83 टक्के, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी, असा चेक करा निकाल
– लोणावळा शहरात 4 जून रोजी ‘संकल्प नशामुक्ती मॅरेथॉन’, अभिनेता सुनिल शेट्टी राहणार उपस्थित, अशी करा नोंदणी