मावळ तालुक्यातील अनेक गावांत महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणाऱ्या तळेगाव दाभाडे येथील हॅन्ड इन हॅन्ड संस्थेमार्फत डोणे गावात एक स्तुत्य उपक्रमांचा शुभारंभ गुरुवार (दिनांक 30 मार्च) रोजी करण्यात आला.
हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्था तळेगाव दाभाडे आणि गृपो अंटोलीन इंडिया प्रा.ली. सी.एस.आर च्या मदतीने मावळमधील डोणे गावातील महिलांच्या एका ग्रुपने दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचा व्यवसाय सुरु केला आहे. दिनांक 30 मार्च 2023 रोजी या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. डोणे गावात संस्थेमार्फत ग्रामीण उपजीविका तयार करणे/सशक्त करणे प्रकल्प राबवला जात आहे, त्याअंतर्गत ही सुरुवात करण्यात आली. ( Start of Paneer manufacturing business through women group in Done village One step in economic empowerment of women )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गावातील विविध महिला बचत गटाच्या सदस्य यांनी एकत्र येऊन पनीर व्यवसायिक ग्रुप तयार केला. व्यवसाय करण्या करिता खवा आणि पनीर बनिवण्याची मशीन, पनीर मोल्ट व क्रिम सेप्रेटेर घेण्याकरिता आर्थिक सहाय्य करण्यात आले. सदर उद्घाटन कार्यक्रमाला गावातील विविध महिला बचत गटांच्या सदस्य उपस्थित होते. हॅण्ड इन हॅण्ड इंडिया व गृपो अंटोलिन इंडिया यांचे डोणे गावच्या महिला बचत गटाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला डोणे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य व गावातील इतर ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. सदर उद्घाटन कार्यक्रमास हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेमार्फत अनिल पिसाळ, सारिका शिंदे, मनीषा कारके व पंढरीनाथ बालगुडे आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– कार्ला गावांत महिला ग्रुपच्या माध्यमातून पनीर निर्मिती व्यवसायाची सुरुवात, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे स्तुत्य पाऊल
– वडगाव शहरातील एकूण 82 दिव्यांग लाभार्थ्यांना अपंग कल्याण निधीतून 4 लाख 10 हजार रुपये निधीचे वाटप