कार्ला ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच दिपाली दीपक हुलावळे यांना राज्यस्तरीय नालंदा ग्रामसमृद्धी पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले आहे. नालंदा ऑर्गनायझेशन मार्फत महाराष्ट्र राज्य कला आणि विद्याशिक्षण क्रांतिचा केंद्रबिंदू अर्थात नालंदा ग्रामसमृद्धी पुरस्कार 2024 चे वितरण रविवारी (दि. 23 जून) रोजी करण्यात आले. पुण्यातील पत्रकार भवन येथे हा पुस्कार प्रदान सोहळा झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यातील कार्ला गावच्या कृतीशील सरपंच तथा पुणे महानगर नियोजन समितीच्या सदस्या दिपाली दीपक हुलावळे यांना यंदाच्या नालंदा ग्रामसमृद्धी आदर्श सरपंच पुरस्काराने गौरवण्यात आले. ( State Level Nalanda Gram Samruddhi Award to Karla Gram Panchayat Sarpanch Dipali Hulawle )
महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचलनालयातील प्रशासन अधिकारी तथा योजना अधिकारी सचिन अनंत कळवस, सहाय्यक निरीक्षक पांडूरंग माणिक वाघमारे आणि अभिनेते विनोद वनवे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. नालंदा ऑर्गनायझेशनचे कार्यक्रम अधिकारी श्रीकांत रविंद्र जायभाय यांनी सहकाऱ्यांसमवेत कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
अधिक वाचा –
– वाढदिवसानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेत शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप । Maval News
– ‘I Nilesh Lanke..’ कमालच झाली ! निलेश लंकेंनी थेट इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ, सुजय विखेंना कृतीतून प्रत्युत्तर – पाहा Video
– येळसे गावात भात लागवडीस सुरूवात, मावळ कृषि विभागाच्या कृषि संजिवनी मोहिमेला यश । Maval News