Dainik Maval News : मावळ तालुक्यातील निसर्गसंपदा आणि जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी, प्रस्तावित शिरोता वनक्षेत्र हद्दीत विज प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी व पर्यावरण मित्रांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. वडगाव येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांना या संदर्भात सविस्तर निवेदन देण्यात आले. “प्रकल्प कायमस्वरूपी रद्द न झाल्यास आमरण उपोषण आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी आणि युवकांनी दिला आहे.
सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आणि डोंगर उत्खनन होण्याची भीती असून, यामुळे पर्यावरणाचे न भरून निघणारे नुकसान होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे दुर्मिळ प्रजातींच्या अस्तित्वावर गदा येणार आहे. तसेच स्थानिकांना विश्वासात न घेता किंवा त्यांच्या हरकतींकडे दुर्लक्ष करून हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदन देताना उपस्थित युवकांनी स्पष्ट केले की, मावळचा निसर्ग हीच आमची खरी संपत्ती आहे. तुटपुंज्या रोजगारासाठी आम्ही निसर्गाचा बळी देऊ देणार नाही. जर प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन प्रकल्प तातडीने थांबवला नाही, तर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. यावेळी मावळ भागातील पर्यावरणाचे रक्षण करणारे कार्यकर्ते, युवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
निसर्गाला हानी पोहचणार?
या पठारावर समृद्ध व जैवविविधतेने नटलेले जंगल आहे. मावळातील अतिसंवेदनशील हा भाग असून सर्वाधिक सांबर नावाचा वन्यप्राणी या वनक्षेत्रात मोठया प्रमाणात आधळतो. तसेच महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू व हरणाची दुर्मिळ जात पिसोरी याही प्राण्याचे वास्तव्य या जंगलात आहे. मात्र, या प्रकल्पामुळे याठिकाणच्या जंगल नष्ट होऊन येथील वन्यप्राणी बेघर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– गुडन्यूज ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित, महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना १ हजार ८३७ कोटींचे वितरण
– राज्य शासनाने अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदीनंतर पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला रेल्वे मंत्रालयाने गती देण्याची मागणी
– मावळात काळ्या काचा अन् फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची संख्या वाढली ; एलईडी दिव्यांमुळे होताहेत अपघात