Dainik Maval News : काश्मीर खोऱ्यामधील पहलगाम बैसरन घाटी परिसरामध्ये दहशतवाद्यांनी मंगळवारी (दि. 22) पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. पहलगाम येथील या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा लोणावळा शहरामध्ये सर्वपक्षीयांकडून जाहीर निषेध करण्यात आला.
लोणावळा शहरातील सर्व राजकीय पक्ष, नागरिक आणि पत्रकार यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गुरुवारी (दि. 24) सायंकाळी निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी आदी सर्व राजकीय पक्ष, विविध संघटना आणि नागरिक हे छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी एकत्र जमून त्यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदविला.
अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार करण्यापूर्वी त्यांचा धर्म विचारला, पुरुष पर्यटकांच्या अंगावरचे कपडे उतरवत त्यांच्यावर गोळीबार केला. अतिशय संताप आणणारा असा हा सर्व प्रकार असून भारत देशामध्ये धर्माचे बीज रोवणाऱ्या पाकधार्जिनी प्रवृत्तीचा निषेध केला. भारत सरकारने ठोस पावले उचलत अतिरेक्यांचा खात्मा करावा, तसेच अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करावेत, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार