तळेगाव दाभाडे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील आदर्श शाळेच्या गेटबाहेर शाळेतील विद्यार्थी आणि त्याच्या दोन मित्रांना टोळक्याकडून बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Student And His Friends Were Beaten Up By Gangs Outside Gate Of Adarsh School Shocking Incident In Talegaon Dabhade City )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिनांक 15 मार्च रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आदर्श शाळेच्या गेट समोर तळेगाव दाभाडे (ता. मावळ जि. पुणे) इथे हा संपूर्ण प्रकार घडला. एका 17 वर्षीय मुलाने याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुख्य तिघे आणि आणखीन चार ते पाच जणांवर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 143, 147, 148, 326 आर्म अॅक्ट 4, 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 15 मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास फिर्यादी तरुण हा आणखी एका मित्राला मोटारसायकलवर सोबत घेऊन पेपरला बसलेल्या विद्यार्थी मित्राला आणण्यासाठी गेला होता. तेव्हा संबंधित मुलगा पेपर देऊन शाळेबाहेर आल्यानंतर त्याच्यासोबतचा जुणा राग मनात धरुन फिर्यादीत नमुद आरोपींनी फिर्यादी, त्याचा मोटारसायकलवरील मित्र आणि पेपर सोडवून आलेल्या विद्यार्थी तरुणाला हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
हेही वाचा – देशी बनावटीचे पिस्तूल आणि किलोभर गांजा सह दोन तरूणांना मावळ तालुक्यातील पुसाणे येथून अटक
तसेच एका मुख्य आरोपीने हातात लोखंडी रॉड घेवून फिर्यादीच्या डोक्यात आणि त्याच्यासोबत मोटारसायकलवर आलेल्या मित्राच्या हातावर मारून त्यांना जखमी केले. तसेच आणखी एका मुख्य आरोपीने पेपर देऊन बाहेर आलेल्या विद्यार्थी तरुणाच्या उजव्या कानावर दगड मारून त्याला जखमी केले. तसेच इतर आरोपींनी तिघांनाही लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले असे फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे. सदर प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसून या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि इंगळे हे करत आहेत.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात हे काय सुरु आहे? प्रेम प्रकरणावरून एकाला घरात घुसून मारहाण आणि…
– तळेगाव दाभाडे शहरात राहत्या घरासमोरून दुचाकी लंपास, अज्ञात चोरट्यावर गुन्हा