भावी पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा, गडकोटांविषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने सह्याद्री प्रतिष्ठान व सह्याद्री विद्यार्थी अकादमीच्या वतीने दिवाळीमध्ये किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शहरातील छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वानी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. शिवरायांच्या गडकोटांचा वारसा तरूण पिढीपर्यंत पोहचावा त्यातुनच या गडकोट संरक्षणाचे बीज त्यांच्या मनामध्ये रूजावे या उद्देशाने सह्याद्री प्रतिष्ठान कार्य करत असते. ( Student Visit To Lohgad Fort By Sahyadri Pratishthan Maval and Sahyadri Vidyarthi Academy )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गावातील लहान मुलांनी स्पर्धेत उत्स्फुर्त सहभाग नोंदवला, त्यांना बालवयातच महाराजांच्या किल्ल्यांविषयी आवड निर्माण व्हावी व किल्ल्यांची महती समजावी याच हेतुने कामशेत ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य श्री. परेश (आण्णा) बरदाडे यांच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व 45 विद्यार्थ्यांसाठी किल्ले लोहगड दुर्गदर्शन सहल आयोजित करण्यात आली होती, ह्या सहलीचा सर्व मुलांनी मनसोक्त आनंद घेतला.
तसेच मुलांना लोणावळ्यातील शिवशाही ऐतिहासिक शस्त्रसंग्रहालय मोफत पहाण्याची संधी प्रमोद बोऱ्हाडे सरांमुळे मिळाली. किल्ले लोहगड सहलीसाठी बस व्यवस्था तसेच गडावर जाण्यापूर्वी नाष्टा आणि गड फिरून झाल्यावर मुलांसाठी जेवणाची सोय परेश (आण्णा) बरदाडे वतीने करण्यात आली होती. लोहगड दुर्गदर्शन सहलीला मुलांच्या सुरक्षितेसाठी सह्याद्रीचे 15 दुर्गसेवक सोबत होते, तसेच शिवप्रेरणा मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. किल्ल्यावर गेल्यानंतर त्याठिकाणच्या प्रत्येक वास्तू बद्दल माहिती किल्ल्याचा इतिहास श्री सचिनभाऊ शेडगे यांनी मुलांना सांगितला.
अधिक वाचा –
– मावळ तालुका सहकारी ग्रामोद्योग संघाची निवडणूक बिनविरोध, बहुतांश विद्यमान संचालकांचीच संघावर पुन्हा वर्णी
– भयंकर..! दारूड्या पोराचा बापाने केला खून, कुऱ्हाडीने घाव घालत केला भांडणाचा शेवट
View this post on Instagram