Dainik Maval News : मावळ तालुक्यातील नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या कार्ला येथील श्री एकविरा विद्या मंदिर शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृती (एन एम एम एस) परीक्षेत पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. तर सहा विद्यार्थी सारथी शिष्यवृत्ती पात्र झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतिने घेण्यात आलेल्या अर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून श्री एकविरा विद्या मंदिरातील कु प्राची गणेश भानुसघरे, कु विशाल विजय उगले ह्या दोन विद्यार्थ्यांची शिष्यवृती साठी निवड झाली असून या विद्यार्थांंना पुढील शिक्षणासाठी साठ हजार रुपये शिष्यवृती मिळणार आहे.
- सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक उमेश किसन इंगुळकर हे दरवर्षी शाळेचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणत असून यावर्षी देखील दोन विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत चमकले आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सारथी योजनेअंतर्गत छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती साठी कु हर्षदा रंगनाथ पडवळ, कृष्णाई विष्णू हुलावळे, श्रावणी संतोष बोरकर, सिद्धेश संजय मोरे, विराज मोहन भानुसघरे, आदित्य एकनाथ देवकर या सहा विद्यार्थांंची निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे अन्य पदाधिकारी, मुख्याध्यापक संजय वंजारे, सरंपच दिपाली हुलावळे, शाळेचे शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी, परिसरातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number