राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेल्या श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या स्मारकाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. श्री संत जगनाडे समाधी मंदिरात भाविकांचा ओघ पाहता या जागेच्या विकासासह अतिरिक्त सुविधा पुरविण्यासाठी 66.11 कोटी रूपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील दुरूस्ती, घाट बांधकाम, पर्यटन निवास, कंपाऊंड भिंत, संग्रहालय निर्मिती आदींना प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर घेण्यात यावी. निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाचे कार्यारंभ आदेश द्यावेत. या आराखड्याच्या कामाचे भूमीपूजन पुढील महिन्याच्या सुरुवातीला करण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात आढावा घेतला. या बैठकीस क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार सुनील शेळके, अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, वित्त विभागाच्या सचिव शैला ए., सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, क्रीडा विभागाचे आयुक्त राजेश देशमुख आदी उपस्थित होते. पुणे विभागाचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पुणे महानगर आयुक्त योगेश म्हसे आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. ( groundbreaking ceremony of Sant Jaganade Maharaj Temple development Sudumbare village )
पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील विविध विकासकामांना मान्यता देऊन भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या निधीतून सुरु असलेल्या विकासकामांना गती देऊन ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करावीत. त्याचप्रमाणे प्रस्तावित विकासकामांची निविदा प्रक्रिया पार पाडून प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी. मावळ विधासनभा मतदारसंघातील पूर्ण झालेल्या विकासकामांचे उद्घाटन आणि निविदा प्रक्रिया झालेल्या कामांचे भूमीपूजन सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला घेण्याबाबतची तयारी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित शासकीय यंत्रणांना दिले.
अधिक वाचा –
– महिला, युवक, पोलीस अधिकारी सर्वांनीच केले रक्तदान ; खोपोलीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद । Khopoli News
– वडगावात दोन जखमी मोरांना जीवदान । Vadgaon Maval
– म्हशी चरायला गेल्या पण परत आल्याच नाहीत, पुसाणे येथील दुर्दैवी घटना । Maval News