वडगाव मावळ मधील दुय्यम निबंधक कार्यालयात एकाने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्म’हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक (दिनांक 28 नोव्हेंबर) घटना घडली आहे. दुय्यम निबंधकांनी दस्ताची नोंदणी करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून सदर व्यक्तीने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. किरण शांताराम भोसले (रा. बारामती) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ( Suicide Attempt At Second Registrar Office Vadgaon Maval )
मावळ तालुक्यातील बेडसे येथील जमीन खरेदीचे दस्त नोंदणी करण्यासाठी किरण भोसले हे सोमवारी (दिनांक 28 नोव्हेंबर) वडगाव मावळ येथील दुय्यम कार्यालयात आले होते. भोसले खरेदी करत असलेली जमीन ही खासगी वनीकरण असलेली होती. तसेच या मिळकतीचे त्यांनी चुकीचे मूल्यांकन केले असल्याच्या कारणाने दुय्यम निबंधक संतोष कराळे यांनी दस्त नाकारला होता.
भोसले यांनी शासनाचे न हरकत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडले होते. मात्र, निबंधकांनी दस्त नाकारल्याच्या कारणावरून किरण भोसले यांनी विषारी द्रव्य पदार्थ पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन भोसलेंना पुढील उपचारासाठी सोमटणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
हेही वाचा – Video : वडगाव शहर भाजपा पदाधिकाऱ्यांकडून संविधान दिन उत्साहात साजरा, घटनेच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन
किरण भोसले हे खरेदी करत असलेल्या जमिनीचे त्यांनी चुकीचे मुल्यांकन केले असल्याने आम्ही दस्त करण्यास नकार दिला. या कारणावरून भोसले यांनी स्वत:च पोलिसांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, अशी माहती वडगाव मावळ प्रभारी दुय्यम निबंधक संतोष कराळे यांनी दिली.
अधिक वाचा –
– L&T कंपनीच्या कामगारांसाठी आमदार शेळके मैदानात, मागण्या मान्य न झाल्यास ‘तळेगाव MIDC बंद’ करण्याचा इशारा
– लोणावळा बस स्टँड परिसरात 18 वर्षीय तरुणीचा विनयभंग, तरूणावर गुन्हा दाखल