Dainik Maval News : मावळ तालुक्यात (maval taluka) रब्बी हंगाम (rabi crop) व ऊसतोड हंगाम संपत आला आहे. दरम्यान शेतकऱ्यांकडून मोकळ्या झालेल्या शेतजमिनीच्या मशागतीची कामे सुरू करण्यात आली आहेत. जमिनीची नांगरट, फणनी करणे, शेणखत टाकणे, जैविक खतांची मात्रा टाकण्याचे काम सध्या शेतकऱ्यांनी सुरू केले आहे.0
सध्या तीव्र उन्हाचा मार्च महिना संपत आला आहे, तर एप्रिल, मे व अर्धाअधिक जून हे उन्हाचे महिने बाकी आहेत. मावळ तालुक्यात मागील वर्षी पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे शेती मशागती कामांना गती मिळाली आहे. जून व जुलै महिन्यात पावसाची सुरुवात झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे
- मावळात खरीप हंगामासाठी व आडसाली ऊस पिकाच्या लागणीसाठी जोरदार शेती मशागतीची कामे आतापासून सुरू झाली आहेत. शेतकरी ट्रॅक्टरने आपल्या शेतीची नांगरट करताना दिसत आहेत. सोबतच शेणखत, पोल्ट्री खत व सेंद्रीय खतांची मात्रा जमिनीत देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
रब्बी आणि ऊस तोडणी हंगाम संपल्याने शेतजमिनी रिकाम्या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतात पाण्याचा स्रोत उपलब्ध करण्यासाठी नवीन विहीर खोदणे, जुन्या विहिरीची डागडुजी करणे, पाइपलाइन करणे आदी कामांना गती देत आहे. शेतकरी शेतीकामात व्यस्त आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान