केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अलिकडील अनेक निकालांनंतर निर्माण झालेले प्रश्न आणि विश्वासार्हता यावर होणारी चर्चा पाहता या चर्चेच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीबाबत सुप्रीम कोर्टाने हा निर्णय घेतला. त्यानुसार आता आयुक्तांच्या निवडीसाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश हे असणार आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
BREAKING: Supreme Court calls for committee including PM, Chief Justice of India, Leader of Opposition to appoint Election Commissioners
report by @AB_Hazardous #SupremeCourt #SupremeCourtOfIndia https://t.co/2jKrLGSDrN
— Bar and Bench (@barandbench) March 2, 2023
याचाच अर्थ आता आयुक्तांची निवड ही यापुढे केंद्र सरकारद्वारे न होता, त्यासाठी पंतप्रधान, संसदेतील विरोधीपक्ष नेते आणि सरन्यायाधीश यांची समिती असेल. राष्ट्रपती समितीद्वारे प्रस्तावित नावाला मंजुरी देतील. एकंदरीत शिवसेना पक्षाच्या बाततीत आयोगाने दिलेल्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि त्यावर सातत्याने होणारी चर्चा यावर आता थेट सर्वोच्च न्यायालयाने हा मोठा निर्णय घेतला आहे. ( Supreme Court calls for committee including PM Chief Justice of India Leader of Opposition to appoint Election Commissioners )
अधिक वाचा –
– कसबा पेठ पोटनिवडणूक निकाल Live : पंधराव्या फेरीनंतर रविंद्र धंगेकर यांची निर्णायक आघाडी, वाचा निकाल सविस्तर
– चिंचवड पोटनिवडणूक निकाल Live अपडेट : अकराव्या फेरीनंतर जगताप आणि काटे यांच्यात काँटे की टक्कर, वाचा निकाल सविस्तर