राज्यातील लाखो बैलगाडा प्रेमींसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने बैलगाडा शर्यतींना हिरवा कंदील दाखवला आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने कर्नाटकातील कंबाला आणि तामिळनाडूमधील जलीकट्टूला देखील परवानगी दिली आहे. ( Supreme Court Upholds Validity Of Jallikattu Bailgada Sharyat Bullock Cart Races )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महाराष्ट्र सरकारने बैलगाडा शर्यतीबाबत बनवलेला कायदा सुप्रीम कोर्टाने वैध मानला आहे. तसेच कायद्यात करण्यात आलेले बदल समाधानकारक असल्याने आता बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्याची आवश्यकता नाही, असे निरिक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे. एकंदरीत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या सर्वोच्च निकालामुळे बैलगाडा शर्यतीच्या मार्गातील सर्वच अडथळे दूर झाले आहेत. ( Big Relief To Maharashtra Tamil Nadu Karnataka Government )
घोडा आणि बैल या प्राण्यांशी संबंधित शर्यतींवर ग्रामीण भागाचे अर्थकारण मोठ्याप्रमाणावर अवलंबून आहे. अशा शर्यतींच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे शर्यतींना परवानगी मिळताच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
???? 12.30pm ???? Pune | दु. १२.३० वा., पुणे
LIVE | Media interaction #Pune https://t.co/6bDisy8Lio— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 18, 2023
तामिळनाडूतील जलीकट्टू, महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती यांवर 2011 मध्ये बंदी घालण्यात आली. तेव्हापासून हे प्रकरण कोर्टात होते. एक मोठा कायदेशीर लढा यासाठी उभारण्यात आला होता. अंतिम सुनावणीसाठी हा विषय घटनापीठाकडे गेला. डिसेंबर 2022 मध्ये यावर सुनावणी पूर्ण झाली, तेव्हापासून सुप्रीम कोर्टाने हा निर्णय राखून ठेवला होता. अखेर आज 5-0 अशा न्यायाधीशांचा फरकाने हा निर्णय जाहीर करण्यात आला.
अधिक वाचा –
– नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठा बदल! कायदा मंत्री किरेन रिजिजू यांची हकालपट्टी, ‘हे’ असणार नवीन कायदा मंत्री
– ‘किशोर आवारे हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या’; तळेगाव दाभाडे शहरात भव्य मोर्चा । Kishor Aware Murder Case
– तुंग गावात मोफत पशुवैद्यकीय आरोग्य शिबिर; पशुपालक शेतकऱ्यांना मिळाले बहुमूल्य मार्गदर्शन