लोणावळा वुमन्स फाउंडेशन यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर “स्वतंत्र महिला” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलिस अधिक्षक IPS सत्यसाई कार्तिक, तसेच पुणे ग्रामीण पोलिस अधिकारी देशमुख मॅडम हे उपस्थित होते.
‘महिला विषयक कायदे’ या घटकावर दोन्ही मान्यवरांनी उपस्थित महिला तसेच विद्यार्थिनींना कायद्यांसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांना असणाऱ्या विविध शंकाचे देखील निराकारण केले. यासह सर्व महिला आणि तरुणींना कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये पोलिस दल कायम आपल्या सोबत असल्याचा विश्वास IPS सत्यसाई कार्तिक यांनी दिला. ( Swatantra Mahila Program Organised By Lonavala Womens Foundation In Presence Of IPS Satya Sai Karthik )
कुठलाही गुन्हा उघडकीस आला तर कारवाई करता येते, तसेच गुन्हेगारीला सुद्धा आळा घालता येतो. त्यामुळे सर्वात अगोदर नागरिकांनी कुठेही गुन्हा घडत असेल तर त्यासाठी पोलिसांना कळवणे गरजेचे आहे, असे मत सत्यसाई कार्तिक यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी पोलिस दलातील महिला अधिकारी, लोणावळा शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोणावळा वुमन्स फाउंडेशनच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वांनी मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने साजरा केला. परंतु आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनी सुद्धा देशामध्ये काही मोजक्या समाज कंटकांमुळे महिलांचे स्वातंत्र्य धोक्यात येत आहे. अनेकदा अन्याय होऊन सुद्धा कायदेविषयक साक्षरता नसल्याने महिलांना गप्प रहावे लागते आणि अशी वेळ भविष्यात येऊ नये, यासाठी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून “स्वतंत्र महिला” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– सह्याद्री फाउंडेशन आयोजित दहीहंडी उत्सव 2023 अध्यक्षपदी सुनिता कुडे तर कार्याध्यक्षपदी ‘यांची’ निवड । Vadgaon Maval
– पवन मावळमधील ‘या’ रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न; नागरिकांची त्रासापासून सुटका होणार
– अभिनंदन कबीर! वडगावच्या सुपुत्राचे जेईई परीक्षेत उज्वल यश । Vadgaon Maval