सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी 25 हजारांची लाच स्विकारताना मावळ तालुक्यातील तलाठ्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली आहे. ह्या घटनेने मावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सखाराम कुशाबा दगडे (वय 52, तलाठी, सजा करूंज, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयामागील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर सोमवारी (दि. 18 मार्च) ही कारवाई करण्यात आली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतकर्याच्या शेतीच्या गटाची फोड केल्याची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी आरोपी दगडे यांनी 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी 25 हजार रुपये स्विकारताना दगडे यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहात पकडले. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Talathi Arrested Red-handed By Anti Corruption Bureau While Accepting Bribe From Farmer At Vadgaon Maval )
महसूल विभागाला लागलेले लाचखोरीचे ग्रहण केव्हा संपणार, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित असल्याचे या घटनेतून दिसून आले आहे. मागील वर्षी राज्यात लाचखोरीत पहिल्या क्रमाकांवर राहिलेल्या महसूल विभाग याही वर्षी त्याच स्पीडने पुढे चालला आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांत महसूल विभागाचे दोन कर्मचारी लाच घेताना पकडले गेलेत. त्यामुळे हा विभाग यावर्षीच्या पहिल्या तिमाहीतच लाचखोरीत अव्वल आला आहे. मावळ तालुक्यातही लाचखोरीचे प्रमाण वाढताना दिसत असून यावर आवर न घातल्यास सामान्यांची पिळवणूक होत राहणार, हे नक्की.
अधिक वाचा –
– मळवली ते कामशेत स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने पुणे-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत । Pune Mumbai Railway
– वडगाव मावळ शिवजयंती उत्सव समितीची नवी कार्यकारिणी जाहीर, शिवजन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय । Vadgaon Maval
– लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर कामशेत पोलिसांचा रूट मार्च । Kamshet Police Route March