तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनच्या ( Talegaon Dabhade Police ) हद्दीत आज (बुधवार, 19 ऑक्टोबर) रोजी सकाळी भीषण अपघात झाला. एका वाटसरू वृद्ध महिलेला स्कुल व्हॅनने जोरात धडक दिली. यात सदर महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
देसाई (पुर्ण नाव माहिती नाही) ही महिला रस्त्यावरुन जात असताना तिला एका स्कुल व्हॅनने जोरात धडक दिली. यात महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर व्हॅन चालक जागेवरुन फरार झाला. स्थानिक पोलिस आणि वन्यजीव रक्षक संस्थेचे निलेश गराडे यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह रुग्णालयात पाठवला. ( Talegaon Dabhade Accident Woman Died )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! कामशेतजवळ भीषण अपघात, मंत्री संदीपान भुमरेंच्या बंधूचा मृत्यू I Kamshet Accident
– शिळींबमध्ये चोरट्यांनी दुकान फोडलं, गावातल्या मुख्य चौकातील किराणा दुकानातून हजारोंचा माल लंपास