Dainik Maval News : गेल्या तीन दशकात दहा हजारावर निराधार मुलामुलींसाठी काम करत असलेली संपर्क बालग्राम संस्था अनाथांची मायबाप असून संस्थापक अमितकुमार बॅनर्जी आणि रत्ना बॅनर्जी यांनी आईवडिल म्हणून भूमिका निभावली आहे. समाजाने त्यांच्या या कार्यात भरभरून योगदान द्यावे, असे आवाहन तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष चित्रा जगनाडे यांनी केले.
बलुतेदार महिला नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे महिला दिनानिमित्त संचालक मंडळाने मळवली संपर्क बालग्रामला भेट देत तेथील मुलींशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पतसंस्थेतर्फे संपर्क संस्थेस आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी पतसंस्थेच्या अध्यक्ष मीनल फाकटकर, संचालिका शीतल उबाळे, सुनीता कर्पे, प्रियांका साठे आणि व्यवस्थापक सुवर्णा लाखे उपस्थित होते.
संपर्क बालग्रामच्या संस्थापक सचिव रत्ना बॅनर्जी यांनी स्वागत केले. 30 महिलांना साड्या आणि मुलींना खाऊवाटप केले. मुलींचे संगोपन ही अत्यंत नाजूक आणि आव्हानात्मक जबाबदारी बॅनर्जी यांनी 35 वर्षांपासून निभावल्याबद्दल त्यांचा सन्मान माजी नगराध्यक्ष चित्रा जगनाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाबाबत नवीन डेडलाईन ; 10 एप्रिलपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Lonavala News
– संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा ; भंडारा डोंगर येथे आजपासून गाथा पारायण व कीर्तन महोत्सव
– रसायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई ; पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर पर्यावरण मंत्र्यांची भूमिका