Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील मनोहर नगर परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत देशी – विदेशी दारू प्रोव्ही मालाचा अवैधरित्या साठा करून ठेवल्याप्रकरणी २३ वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवार, दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या हद्दीत सवेरा बियर शॉपीच्या बाजूला मोकळ्या जागेत मनोहरनगर येथे ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस शिपाई बाबाराजे रामराव मुंडे यांनी फिर्याद दिली असून आरोपी अतुल दिलीप राठोड ( वय २३ वर्ष, रा. मनोहरनगर, तळेगाव दाभाडे, मूळ राह. कोंदरी ता. महागाव जि. यवतमाळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीवर महाराष्ट्र दारुबंदी अधि. कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अटकेत नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने एकुण २३ हजार ८८० रूपये किंमतीचा देशी – विदेशी दारु प्रोव्ही माल अनाधिकृतपणे, बेकायदेशिररीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगला होता. पोहवा साबळे अधिक तपास करीत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
– पतीचा पराभव, पण पत्नीचा विजय ; कुठे १ मताने तर कुठे २ मताने उमेदवार विजयी ! मावळातील वडगाव नगरपंचायतीचा निकाल ठरला लक्षवेधी
– Dehu : देहू-येलवाडी रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी, लवकरच होणार काँक्रीटीकरण ; ‘पीएमआरडीए’कडून कार्यारंभ आदेश

