तळेगाव दाभाडे शहरात म्हाडा अंतर्गत उभारण्यात आलेल्या प्रकल्पांमधील सदनिकाधारक नागरिकांच्या अनेक तक्रारी येत होत्या. या अनुषंगाने म्हाडाच्या पुणे येथील कार्यालयात संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीला आमदार सुनिल शेळके, पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील, कार्यकारी अभियंता महेश दातार, उपअभियंता प्रकाश वाबळे, मिळकत व्यवस्थापक अतुल खोडे, उपअभियंता संजय नाईक, म्हाडाचे सदनिकाधारक नागरिक आदी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
म्हाडाच्या तळेगावमधील प्रकल्पाचे बांधकाम 2018 साली सुरु झाले होते. परंतू अनेक वेळा मुदतवाढ देऊन देखील प्रकल्प पूर्ण झाला नाही. त्यामुळे येथे सदनिका मिळालेल्या सर्वसामान्य नागरिकांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. प्रकल्पाला म्हाडाकडूनच विलंब झाला असून देखील यातील वाढीव रक्कम सदनिकाधारकांनी भरावी, असा आग्रह म्हाडाकडून करण्यात येत होता. तसेच प्रत्यक्ष ताबा कधी देणार याबाबत अनिश्चितता होती. ( talegaon dabhade city MHADA project home owner problem )
गुरुवारी (दि. 26 ऑक्टोबर) झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर, ‘A आणि D विंग मधील सदनिका 15 नोव्हेंबर पर्यंत ताब्यात देण्यात येतील आणि 15 डिसेंबरनंतर B आणि C विंग मधील नागरिकांना सदनिका ताब्यात देण्यात येतील,’ असे अधिकाऱ्यांनी आश्वासित केले. तसेच संबंधित सदनिकाधारकांनी वाढीव रक्कम भरु नये, असेही सांगितले आहे.
अधिक वाचा –
– लोणावळा शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विशाल पाडाळे; नवनियुक्त अध्यक्षांकडून नूतन कार्यकारिणी जाहीर, वाचा सविस्तर
– कशाळ शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नवनाथ जाधव यांची निवड; वाचा समितीमधील सदस्यांची संपूर्ण यादी
– सांगिसे-बुधवडी ग्रामपंचायतीमध्ये बुधवडी गावातील सदस्य पदाच्या दोनही जागा बिनविरोध; सरपंच पदासाठी तिरंगी लढत