व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘थकीत कर भरा… नाहीतर चौकाचौकात फलकांवर नावे लावू’, थकीत कर वसूलीसाठी तळेगाव नगरपरिषद प्रशासन आक्रमक । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे नगर परिषदेची थकीत करवुसलीसाठी कारवाईचा धडाका लावला आहे. talegaon dabhade municipal council administration is aggressive for recovery of tax arrears.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 31, 2024
in लोकल, शहर
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

File Photo : Talegaon Dabhade Nagar Parishad


तळेगाव दाभाडे नगर परिषदेची थकीत करवुसलीसाठी कारवाईचा धडाका लावला आहे. त्यामुळे शनिवारी (दि. 30) अखेर 21 कोटी 87 लाख रुपये वसुल झाले आहेत. तर 21 मिळकतींवर जप्तीची कारवाई केली आहे. मात्र, जोरदार कारवाई सुरु असतानाच काही थकबाकीदार त्याला दाद देत नसल्याने त्यांची नावे चौका-चौकांतील फलकांवर लावण्याचा इशारा परिषदेने दिला आहे. जोपर्यंत थकीत भरणा होत नाही; तोपर्यंत ही नावे तशीच ठेवण्यात येणार असल्याचेही परिषदेने म्हटले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

तळेगाव दाभाडे शहरात 37 हजार 756 मालमत्तांची नोंदणी नगर परिषदेकडे झालेली आहे. परिषदेला मालमत्ता करापोटी 32 कोटी 95 लाख 60 हजार रूपयांची वसुली करावयाची आहे. त्यापैकी आत्तापर्यंत 17 कोटी 22 लाख रुपये करापोटी तर पाणीपट्टी कराची 9 कोटी 4 लाख रुपये इतक्या मागणीपैकी 4 कोटी 65 लाख असे एकूण 21 कोटी 87 लाख रूपये वसूल झाले आहेत. नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन.के.पाटील, उपमुख्याधिकारी ममता राठोड, कर अधिकारी कल्याणी लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक विजय शहाणे, मिळकतकर व्यवस्थापक जयंत मदगे यांच्यासह बारा विभागांतील अधिकारी व कर्मचारी वसुलीसाठी प्रयत्न करत आहेत. ( talegaon dabhade municipal council administration is aggressive for recovery of tax arrears )

21 मिळकती जप्त –
अनेकवेळा आवाहन करुन आणि नोटिसा पाठविल्या. परंतु, काहींनी कराची रक्कम भरली नाही, अशा 21 मिळकतदारांच्या मिळकतींना सील लावून त्या जप्त करण्यात आल्या आहेत. तर 7 जणांचे नळजोड खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे, जप्तीची कारवाई टाळण्यासाठी थकीत कराची रक्कम त्वरित भरावी, असे आवाहन परिषदेचे मुख्याधिकारी एन.के.पाटील आणि उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी केले आहे.

अधिक वाचा –
– अखेर ठरलं! बारामती लोकसभेत ननंद विरुद्ध भावजय लढत, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा अजित पवार यांना उमेदवारी । Supriya Sule Vs Sunetra Pawar
– शरद पवार यांच्याकडून लोकसभेसाठी 5 शिलेदारांची नावे जाहीर, अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी, पाहा यादी
– लोणावळा येथे अश्लील व्हिडिओ तयार करणारी टोळी गजाआड; पाटणमधील बंगल्यावर पोलिसांचा छापा, 5 महिलांसह 18 जण ताब्यात


Previous Post

उमेदवारी मिळाल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे प्रथमच मावळात; आमदार सुनिल शेळके आणि बाळा भेगडे यांची घेतली भेट

Next Post

‘खासदार श्रीरंग बारणे यांच्या हॅटट्रिक बरोबरच मावळ तालुक्याला प्रथमच केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळेल’ । Maval Lok Sabha 2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mp-shrirang-barne

'खासदार श्रीरंग बारणे यांच्या हॅटट्रिक बरोबरच मावळ तालुक्याला प्रथमच केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळेल' । Maval Lok Sabha 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.