Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून इच्छुकांकडून उमेदवारी मागणी अर्ज मागविले आहेत. हे अर्ज शनिवार (दि. १८) पर्यंत तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन मावळचे आमदार सुनील शेळके व तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे.
नगरपरिषदेच्या प्रभागनिहाय आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर, वाढत्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकजुटीने या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे. त्यानुसार, इच्छुक सदस्यांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अर्ज वितरण आणि सादर करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे ;
उमेदवारी अर्ज १६ ते १८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान सुरेश धोत्रे यांच्या शुभम कॉम्प्लेक्स येथील जनसंपर्क कार्यालयात उपलब्ध असतील. भरलेले अर्ज शनिवारी (दि. १८) सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत याच ठिकाणी जमा करावेत. त्यानंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. तसेच अर्ज स्वीकृतीनंतर रविवारी (दि. १९) सकाळी १० वाजता, खांडगे पेट्रोल पंपाजवळील इशा हॉटेल येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. सर्व इच्छुकांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह वेळेत सादर करून संपर्क साधावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागविले इच्छुक उमेदवारांचे अर्ज
– ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा ३ नोव्हेंबरपासून – वाचा सविस्तर
– जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, पोलीस अधीक्षकांच्या सुचनाही नजरेआड ; लोणावळा शहरात अवजड वाहनांची वाहतूक सुरूच