Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून शहरात स्वच्छतेच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर अविघटनशील प्लॅस्टिक पिशवी वापराविरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे.
गुरुवारी (दि.५) नगराध्यक्ष संतोष दाभाडे आणि मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनानुसार व अभिषेक शिंदे (विभाग प्रमुख) यांच्या सूचनेनुसार तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील गाव भागातील मारुती मंदिर चौक येथील दुकानदार व्यापारी, फळ विक्रेते, भाजी विक्रेते, किरकोळ विक्रेते, फुल विक्रेते इत्यादी नागरिकांना प्लास्टिक कॅरीबॅग वापरू नये याबाबत लिंब फाटा ते मारुती मंदिर चौक या भागात समजपत्र देण्यात आले.
तसेच ज्यांच्याकडे बंदी असूनही प्लॅस्टिक पिशव्या आढळून येईल, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या. याप्रंसगी स्वच्छता निरीक्षक प्रशांत शिवणे, सुनील काळकुटे, दत्तात्रय ढवळे, शहर समन्वयक शुभम चौकटे, स्वच्छता पर्यवेक्षक राहुल आगळे इत्यादींनी मोहिमेत सहभाग घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा
– वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई
– पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर
