तळेगाव दाभाडे नगरपरिषद ( Talegaon Dabhade Nagar Parishad ) प्रशासनाकडून मालमत्ता कर वसुलीची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. नगरपरिषद हद्दीतील ज्या मालमत्ताधारकांनी मागील काही वर्षापासून मिळकतकराचा नियमित भरणा केलेला नाही आणि ज्यांची मिळकत कर थकबाकीची रक्कम ही 50 हजारांपेक्षा अधिक थकीत आहे, अशा सर्व मिळकतधारकांना जप्ती वॉरंट लागू करण्याची कारवाई नगरपरिषदेने सुरू केली आहे. ( Talegaon Dabhade Municipal Council Property Tax Recovery Campaign Warrant of seizure for property tax delinquents )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर जप्ती वॉरंट कालावधीमध्ये थकीत रकमेचा भरणा नगरपरिषद कार्यालयात न केल्यास संबंधित मिळकत धारकांची जंगम, स्थावर मालमत्ता जप्त करून त्याच्या लिलाव प्रक्रियेमधून नगरपरिषद आपली देणी वसूल करून घेणार असल्याचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक ( Vijayakumar Sarnaik ) यांनी सांगितले.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेला या वर्षी शहरातील एकूण 39, 861 मालमत्ता धारकांकडून 43 कोटी 24 लाख हजार 900 रुपये वसूल करायचे असून, या वर्षी नगरपरिषदेने वसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट ठेवले आहे. थकबाकीदारांनी आपल्या थकीत मिळकतकराचा भरणा त्वरित करून जप्तीची कारवाई टाळण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी सरनाईक यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– मुळशी तालुक्यातील प्लस व्हॅली येथील खोल कुंडात बुडून 23 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू
– स्व. यशवंतराव चव्हाण क्रीडा महोत्सव 2022 : बीट स्तरीय क्रीडा स्पर्धेत चंदनवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश