व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव नगरपरिषदेच्या ‘त्या’ जेसीबीचा इन्शूरन्स आधीच संपलेला? मुख्याधिकारी की ठेकेदार, नुकसानीला जबाबदार कोण?

'तीन दिवसांपूर्वी तळेगाव दाभाडे नगर परिषदेची मालमत्ता असणारा जेसीबी जळून खाक झाल्यामुळे नागरिकांच्या कष्टाच्या आणि घामाच्या पैशांचा नाश झालाय.'

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 13, 2024
in लोकल, शहर
Talegaon-Nagar-Parishad-JCB

Photo Courtesy : Team Dainik Maval


‘तीन दिवसांपूर्वी तळेगाव दाभाडे नगर परिषदेची मालमत्ता असणारा जेसीबी जळून खाक झाल्यामुळे नागरिकांच्या कष्टाच्या आणि घामाच्या पैशांचा नाश झालाय. हे बेजबाबदार प्रशासनाचे लक्षण आहे’, असे मत तळेगाव दाभाडे काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष योगेश पारगे यांनी व्यक्त केले. तसेच सदर जेसीबी मशीन हे अशोक इंटरप्राईजेस या कचरा कॉन्ट्रॅक्टरला भाडेतत्त्वावर वापरण्यास दिले होते, अशी माहिती मिळत असून सदर जेसीबी मशीनची किंमत 25 लाखांच्या घरात आहे. परंतू एवढ्या मोठ्या किमतीचे वाहन मालमत्ता स्वरूपात असताना त्याचे इन्शूरन्स रिन्यू केले नसल्याचे समजत आहे, असेही पारगे यांनी सांगितले.

इन्शूरन्स रिन्यू न करण्याचे परिणाम नगर प्रशासनाला भोगावे लागणार आहे. अशोक इंटरप्राईजेस बरोबर झालेल्या करारात इन्शुरन्स बाबतचा कुठलाही उल्लेख स्पष्टपणे नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सदर मालमत्तेचे नुकसान कोण भरून देणार याबाबत नगर परिषद प्रशासनाने खुलासा करणे गरजेचे आहे, असे मत योगेश पारगे यांनी व्यक्त केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

एवढ्या मोठा प्रमाणात नगरपरिषदेच्या ट्रॅक्टर डंपर ट्रॉली तसेच जेसीबी मशीन असताना यांना पार्किंग करण्यासाठी जागा मिळू नये, ही हास्यास्पद गोष्ट आहे. तसेच एवढ्या मोठ्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सिक्युरिटी गार्डची तसेच सीसीटीव्हीची व्यवस्था नाही ही देखील खेदाची बाब आहे, असे पारगे यांनी नमूद केले आहे. इन्शुरन्सद्वारे सदर नुकसान भरून निघाले असते परंतू इन्शुरन्स रिन्यू न केल्यामुळे संपूर्ण 25 लाखांचे नुकसान झालेले आहे, सदर नुकसान कोण भरून देणार याचा खुलासा नगर परिषदेने करावा अशी जाहीर विनंती योगेश पारगे यांनी केलीये. ( Talegaon Dabhade Nagar Parishad JCB was Burnt News Updates )

अधिक वाचा –
– Breaking! किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन, संगीत विश्वावर शोककळा । Prabha Atre Passed Away
– दुर्दैवी! लोणावळ्यात सुपरफास्ट एक्सप्रेसमधून फलाटवर पडल्याने रेल्वे प्रवाशाचा मृत्यू । Lonavala News
– राष्ट्रीय युवा दिनानिमित्त भाजपाकडून रक्तदान शिबिर; रविंद्र भेगडेंसह अन्य पदाधिकाऱ्यांनीही केले रक्तदान । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

मावळ भाजपाची युवा वॉरियर्स कार्यकारणी जाहीर; ‘तरुणांनी स्वामी विवेकानंद, नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा’ – रविंद्र भेगडे

Next Post

मावळ तालुक्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा दुपारच्या लोकल फेऱ्या पुर्ववत, सोमवारपासून असे असेल वेळापत्रक । Pune Lonavala Local

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pune-Lonavla-Local

मावळ तालुक्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा दुपारच्या लोकल फेऱ्या पुर्ववत, सोमवारपासून असे असेल वेळापत्रक । Pune Lonavala Local

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.