स्वामी विवेकानंद यांची जयंती (दि. 12 जानेवारी) अर्थात राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून वडगाव मावळ येथे भारतीय जनता पक्षाच्या पक्ष कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे आणि तालुकाध्यक्ष भाऊसाहेब गुंड यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले. इतकेच नाहीतर स्वतःही रक्तदान करून सर्वांना प्रेरणा दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
भारतीय जनता पार्टी मावळ तालुका युवा वॉरियर्सचे अध्यक्ष प्रणेश नेवाळे यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने आणि जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतनिमित्त ह्या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रामदास गाडे, कोषाध्यक्ष सुधाकर ढोरे, महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिजीत नाटक, सरचिटणीस अभिमन्यू शिंदे , सचिन येवले यांच्यासह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Blood Donation Camp by BJP at Vadgaon Maval on occasion of National Youth Day )
अधिक वाचा –
– खासदार श्रीनिवास पाटील यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर! पत्नी रजनीदेवी यांचे निधन । Rajni Devi Passes Away
– PM Kisan योजनेचे पैसे मिळाले नाहीत? योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आजच पूर्ण करा ‘ई-केवायसी’, जाणून घ्या प्रक्रिया
– युवा दिन विशेष : ‘गरजू लेकरांना तिनं दिलाय मदतीचा खंबीर हात’ । Help Welfare Trust Deepali Warule