व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

PM Kisan योजनेचे पैसे मिळाले नाहीत? योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आजच पूर्ण करा ‘ई-केवायसी’, जाणून घ्या प्रक्रिया

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.-किसान) योजनेच्या लाभासाठी नोंदणी तसेच ‘ई-केवायसी’ सह अन्य बाबींची शेतकऱ्यांनी पूर्तता करणे आवश्यक आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 12, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे
pm-kisan-samman-nidhi-yojana

File Image


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.-किसान) योजनेच्या लाभासाठी नोंदणी तसेच ‘ई-केवायसी’ सह अन्य बाबींची शेतकऱ्यांनी पूर्तता करणे आवश्यक आहे. याबाबत राज्यात 15 जानेवारीपर्यंत गावपातळीवर सुरु असलेल्या विशेष मोहिमेत सहभागी होत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने ‘पी.एम.-किसान’ योजना सुरु केली आहे. नोंदणी केलेले लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे ई-केवायसी केलेले शेतकरी कुटुंब या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. पी. एम. किसान योजनेचा 16 वा हप्ता जानेवारी महिन्यात वितरीत करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. ( Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojna appeal farmers to register and complete EKYC )

या योजनेंतर्गत पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्यांचा समावेश असेल अशा सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास 2 हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी 6 हजार रुपये लाभ अदा करण्यात येत आहे. भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसलेल्या पात्र लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश करण्यास अद्यापही वाव असल्याने शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा.

ईकेवायसीसाठी नजीकच्या सामाईक सुविधा केंद्राशी आणि बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत पूर्तता करावी. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी कळविले आहे.

अधिक वाचा –
– लोणावळ्यात दिसली सामान्यांची ताकद! विविध प्रलंबित मागण्यांसाठी रेल रोको आंदोलन, डेक्कन क्विन रोखल्याने रेल्वे प्रशासनाची धावपळ । Lonavala Railway Movement
– सॉल्लिड कामगिरी! कामशेत पोलिसांकडून गहाळ झालेल्या 19 मोबाईलचा शोध, थेट कर्नाटकातून हस्तगत केले फोन । Maval Crime
– पवना आणि टाटा धरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालय स्तरावर विशेष बैठक संपन्न । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

युवा दिन विशेष : ‘गरजू लेकरांना तिनं दिलाय मदतीचा खंबीर हात’ । Help Welfare Trust Deepali Warule

Next Post

खासदार श्रीनिवास पाटील यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर! पत्नी रजनीदेवी यांचे निधन । Rajni Devi Passes Away

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Srinivas-Patil-Rajni-Devi-patil

खासदार श्रीनिवास पाटील यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर! पत्नी रजनीदेवी यांचे निधन । Rajni Devi Passes Away

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Momentum for Lonavala Glass Skywalk path cleared for actual project work as tender draft is finalized

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

August 22, 2026
Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
Accident insurance coverage worth ten lakhs for journalists in Maval Taluka with special cooperation of MLA Sunil Shelke

मावळ तालुक्यातील पत्रकारांना आमदार सुनील शेळके यांच्या विशेष सहकार्याने दहा लाखांचे अपघात विमा सुरक्षा कवच

August 21, 2026
Young scientists from Maval selected for ISRO-NASA study tour congratulated by MLA Sunil Shelke

मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन

August 21, 2026
Dhangar Vasti in Shilimb village Maval Taluka lacks road no road access even 80 years after independence

शिळींबची धनगरवस्ती ‘विकासाच्या रस्त्यापासून’ वंचित ; स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही रस्ता नाही; खांद्यावर दूधाची कावड घेवून रोजची पायपीट सुरूच

August 21, 2026
Woman and newborn baby die after being admitted for delivery at MIMER Hospital in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू

August 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.