Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने मालमत्ता कराची वसुली मोहीम हाती घेतली आहे. यंदा शंभर टक्के वसुलीचा निर्धार पालिकेने केला असून आतापर्यंत मालमत्ता करापोटी 11 कोटी 26 लाख 93 हजार रुपये, तर पाणी करापोटी 3 कोटी 82 लाख 64 हजार रुपये वसुली झाली आहे. ( Talegaon Dabhade Nagar Parishad Property Tax Recovery Campaign )
मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी ममता राठोड व कर संकलन विभागाच्या प्रमुख अधिकारी कल्याणी लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली सुरू करण्यात आलेली आहे. नगरपरिषद हद्दीत 37 हजार मालमत्ताधारक असून त्यांच्याकडून करापोटी 33 कोटी 90 लाख 28 हजार 605 रुपये वसूल करावयाचे आहेत.
- यापैकी एका खासगी कंपनीची थकबाकी 12 कोटी रक्कम गुंतलेली असून, ती न्यायप्रविष्ट असल्यामुळे 29 कोटी वसुली उद्दिष्ट आहे. तर, पाणीपट्टी म्हणून 1 कोटी 66 लाख रुपये वसूल करायचे आहेत. यासाठी नगरपरिषदेने शहराचे बारा विभाग केले असून, त्यासाठी 12 अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.
कर संकलन अधिकारी कल्याणी लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आदेश गरुड, प्रवीण माने, प्रफुल्ल गलियत, वैशाली आडकर, मयूर ढिल्लोड, आशिष दर्गले, प्रवीण शिंदे, प्रशांत गायकवाड, विलास वाघमारे, उषा बेल्हेकर, विशाल लोणारे, अरविंद पुंड आदी अधिकारी – कर्मचारी कर वसुलीसाठी मोहीम राबवत आहेत.
सध्या जप्ती नोटीस वाटप सुरू आहे. त्यानंतर पाणी खंडित केले जाईल. जप्ती कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी वेळेत कर भरावा. शनिवारी व रविवारीही कर भरणा केंद्र सुरू ठेवण्यात आलेले आहे. – विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी, नगरपरिषद, तळेगाव दाभाडे
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा