Dainik Maval News : ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांचे शिष्य, जुन्या पिढीतील कवी व भगवद्गीतेच्या अभ्यासक श्रीकृष्ण विनायक पानसे (वय ८५) यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे एक मुलगा, दोन विवाहित मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक लोणावळा टाईम्सचे संपादक प्रसाद पानसे यांचे ते वडील होत. तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीत रात्री त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रीकृष्ण पानसे यांनी लिहिलेल्या कवितांचा ‘वीणा झंकार’ हा संग्रह प्रकाशित झाला आहे. हिंदू धर्म परंपरा या विषयावर संशोधन करून त्यांनी लेखन केले होते. ते लवकरच पुस्तक रूपाने प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. साहित्य कला संस्कृती मंडळाचे ते संस्थापक सदस्य होते. रामदास स्वामींच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या सर्व संत सत्संग मंडळाचे ते संस्थापक होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ चार स्थानिक स्वराज्य संस्थांना उद्यान विकासासाठी प्रत्येकी 1 कोटी निधी । Maval News
– मावळचे खासदार श्रीरंग बारणे अडचणीत ; वडगाव मावळ कोर्टात बारणेंविरोधात खटला चालणार – जाणून घ्या प्रकरण । MP Shrirang Barne
– मावळ तालुक्यातील ‘या’ ४ ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : e-KYC साठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, जाणून घ्या ई-केवायसी करण्याची प्रक्रिया