Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेतंर्गत (MJPJAY) मोफत कॅन्सर उपचार सुविधेचा शुभारंभ आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी टीजीएच – ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक उदय देशमुख, गणेश खांडगे, शैलेश शाह, डॉ. सत्यजीत वढावकर, डॉ. सचिन देशमुख, प्रताप राजेमहाडीक, डॉ. संतोष साहू आदी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कर्करोगाच्या रुग्णांवर रेडिओथेरपीसाठी अत्याधुनिक टोमोथेरपी या अद्ययावत उपचारप्रणालीचा या योजनेत समावेश झाला असून आर्टीफिशियल इंटेलिजेन्सचा समावेश असलेल्या या तंत्राने कर्करोग झालेल्या अवयवावर 360 अंशच्या कोनामध्ये वि-किरण सोडून उपचार केले जातात. यामुळे रुग्णांवर अधिक परिणामकारकरित्या उपचार करणे शक्य होत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना शहराकडे धाव न घेता आपल्या परिसरातच उत्तमोत्तम सेवा पुरविण्याचा प्रयत्न सेंटरच्या माध्यमातून आम्ही करत असल्याचे टीजीएच ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उदय देशमुख यांनी सांगितले.
“टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर रूग्णालयाच्या माध्यमातून व्यवसाय न पाहता सामाजिक बांधिलकी जपत रूग्ण सेवा हाच एकमेव उद्देश समोर ठेवून सेवा दिली जाते. आता कॅन्सर उपचारासाठी पुणे अथवा मुंबईसारख्या शहरांत न जाता तालुक्यातच उपचार मिळतील. त्यामुळे ही अतिशय समाधानकारक बाब आहे.” असे आमदार सुनिल शेळके म्हणाले.
अधिक वाचा –
– भक्तिमय वातावरणात, साश्रूनयनांनी गणरायाला निरोप ; तळेगावात नऊ तास चालली विसर्जन मिरवणूक । Maval News
– माध्यमिक शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी समीर गाडे, उपाध्यपदी गणेश साबळे बिनविरोध । Maval News
– मावळ भाजपाच्या गाव भेट दौऱ्यास आंदर मावळ विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद ; कार्यकर्त्यांचा एकच सूर ‘आता माघार नाही…’